Sunday, May 29, 2022
Homeचंद्रपुरमहापुराच्या प्रलयाला वर्षे पूर्ण

महापुराच्या प्रलयाला वर्षे पूर्ण

बरेच कुटुंबाचा संसार आजही उघड्यावरच
विनोद दोनाडकर
विदर्भ कल्याण
ब्रह्मपुरी: मागील वर्षी 29 ते 30 ऑगस्ट रोजी 20 20 गोसीखुर्द प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले वैनगंगा नदीला महापूर आला होता त्यावेळची ही बिकट परिस्थिती लक्षात घेता अनेक कुटुंबाचे संसार उघड्यावर पडले होते सुदैवाने यात मात्र कोणतीही जीवित हानी झाली नव्हती किंबहुना ते दिवस आठवल्यांवर मात्र अंगावर शहारे येऊन थरकाप सुटतो त्यावेळी वैनगंगा नदीला आलेल्या महापुराने अनेक कुटुंब बेघर झाले आहेत काही कुटुंबांना तटपुंज्या स्वरूपाची मदत मिळाल्याने बऱ्याचश्यां कुटुंबांनी झोपडी बांधून वास्तव्य करीत असल्याचे विदारक चित्र ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदी काटा लागत असलेल्या बहुतांशी गावात पाहायला मिळत आहे.


रणमोचन खरकाडा मांगली या गावाकडून पुनर्वसनाचा मुद्दा आता ऐरणीवर येत असल्याचे स्पष्ट चित्र नागरिकाकडून ऐकावयास मिळत आहे मागील वर्षीची परिस्थिती बघता लोकांना दुसऱ्यांच्या स्लॅपच्या घरावर 25 ते 30 कुटुंबातील लोकांनी मोजक्या स्वरूपाच्या अन्नधान्य वि ना तब्बल आठवडाभर राहुन आप-आपल्या कुटुंबाचा बचाव केला होता शिवाय स्वतःच्या घरात वास्तव्यास राहण्यासाठी पर्यायसुद्धा उरलेला नव्हता ज्यांचे घरे पूर्णता जमीनदोस्त होऊन कोसळले अशा कुटुंबातील व्यक्तींना मात्र इतर ठिकाणी बरेच दिवस नातेवाईकाकडे राहुन काढावे लागले
वैनगंगा नदीला महापूर आला की रनमोचन खरकाडा मागली गावा सह संपूर्ण गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त होते शिवाय त्यांना बाहेर पडण्यासाठी मार्ग उरत नाही अशा परिस्थितीत सदर गावांचा पुनर्वसन करण्यात यावा अशी मागणी या निमित्ताने होऊ लागली आहे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular