Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरभारोसा (इरई, एकोडी ) गट ग्रामपंचायतीवर शेतकरी संघटना समर्पित भाजपाची सत्ता.

भारोसा (इरई, एकोडी ) गट ग्रामपंचायतीवर शेतकरी संघटना समर्पित भाजपाची सत्ता.

श्री.देवराव भिवाजी निमकर यांची सरपंचपदी अविरोध निवड.

निखिल पिदूरकर चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रथम तेलग कोरपणा तालुका प्रतिनिधी याच्या माहिती नुसार

कोरपणा प्रतिनिधी –
कोरपणा तालुक्यातील भारोसा (इरई, एकोडी )गट ग्रामपंचायत शेतकरी संघटना समर्पित भाजपा स्थापन करून एकतेचे दर्शन घडविले. मागील सलग १५ वर्षापासून कांग्रेस चा अभेद किल्ला मानल्या जाणाऱ्या गडाला सुरूंग लावून भारोसा (इरई, एकोडी ) गट ग्रामपंचायतवर शेतकरी संघटना समर्पित भाजपा झेंडा फडकविला आहे

.

 निवडणूकित शेतकरी संघटना समर्पित भाजपा श्री.देवराव भिवाजी निमकर सौ.अर्चना संतोष भोजेकर श्री.सुनील नामदेव पावर सौ.कल्पना सुरेश आगलावे  हे 4 सदस्य निवडून आलेत. साम दाम दंड भेद वापरून सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक रंगतदार करण्याचे, येन केन प्रकारे सत्ता बडकविण्याचे प्रयत्नही पडद्याआडून सुरू झालेत. आता नेमके काय घडेल अशी उत्सुकता जनतेत निर्माण झाली. मात्र सरपंच, उपसरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीत शेतकरी संघटना समर्पित भाजपा एकतेची मोट बांधून विरोधकांचे सर्व मनसुबे उधळून लावले आणि जोरदार दनका दिला. सरपंचपद हे सर्वसाधारण असल्यामुळे श्री.देवराव भिवाजी निमकर यांची अविरोध निवड करण्यात आली तर उपसरपंचपदी सौ.अर्चना संतोष भोजेकर यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी वीरेंद्र ढगे  यांनी काम पाहिले. 

  भारोसा ( इरई एकोडी ) गट ग्रामपंचायतच्या नवनियुक्त सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे परिसरातील नेत्यांनी, स्थानिक जनतेनी अभिनंदन केले आहे. तर निवड झालेल्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच जनतेच्या विश्वासाला पात्र राहून गावात विकास कामांना गती देण्याचा संकल्प केला आहे.
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular