राजुरा प्रतिनिधी
दि.११/०६/२०२३ रोज रवीवारला ला भारतीय बोैद्ध महासभा ,चंद्रपूर जिल्हा आणि भारतीय बौद्ध महासभा शाखा राजूरा च्या अंतर्गत. विक्रमशीला बहुउद्देशीय संस्था बामणवाडा तालुका च्या वतीने दि ११ जून ते २० जून २०२३ पर्यंत सुरू असलेले "दहा दिवसीय धम्म उपासक,उपासिका प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन " डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह.तक्षशिला नगर बामणवाडा " तालुका राजुरा येथे करण्यात आले.सुरुवातीला तथागत गौतम बुध्द व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व अगरबत्ती, मेणबत्ती दीप प्रजलित करून बुद्ध वंदना घेण्यात आली.शिबीराचे उदघाटक आयु.इजी.नेताजी भरणे जिल्हाध्यक्ष व केंद्रीय शिक्षिक भा.बो.महासभा चंद्रपूर जिल्हा हे होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष,आद. धर्मुजी नगराळे राजूरा शाखा प्रमुख मार्गदर्शक आद. अशोक घोटेकर विदर्भ प्रदेश अध्यक्ष व शिबिराचे मार्गदर्शक आयु.नी. सुजाताताई लाटकर केंद्रीय शिक्षिका,सपनाताई कुंभारे केंद्रीय शिक्षिका चंद्रपूर होते.प्रमुख अतिथी म्हणून आद.संदीप सोनोने उपाध्यक्ष, अमरदीप वनकर अध्यक्ष,भारत फुलझेले,मिलिंद कुमार ढोणे,गौतम देवगडे, लालचंद वाघमारे,आयु.नी. मेघाताई बोरकर शहर अध्यक्षा,किरणताई खैरे शहर कोष्याध्यक्ष् ,वंदनाताई देवगडे उपाध्यक्षा, श्रुतीताई वाघमारे,शीतलताई ब्राम्हणे,सुनंदा रामटेके,प्रणालीताई ताकसांडे, यांचे स्वागत करण्यात आले आणि सर्वांनी शिबीरास मार्गदर्शन केले.
बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभा च्या माध्यमातून संपूर्ण भारतभर विद्यान वादी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केल्या जातो.या करिता 24 प्रकारचे शिबीर चे शिबिरे घेऊन बौद्ध धम्माच्या संस्कार चे प्रशिक्षण दिले जाते.महिला करीत धम्म उपसिका प्रशिक्षण शिबीर फार महत्वाचे तक्षशिला नगर बामणवाडा या गावी शिबिरास प्रचंड प्रतिसाद असल्यामुळे आनंद व्यक्त करण्यात आला. या शिबिरात महिला व पुरुषांची उल्लेखनिय उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयु.नी.सुजाताताई नले व संचालन आयु.गौतम चौरे सरचिटणीस आणि आभार प्रदर्शन आयु. सर्वानंद वाघमारे माजी सरपंच यांनी केले.शेवटी भारतीय बोैद्ध महासभेच्या नियमानुसार सरणत्त्य घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. वरील शिबिरे यशस्वी करण्याकरिता विक्रमशीला बहुउद्देशीय संस्था बामणवाडा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार सवर्धन
समिती,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्वय सह्याता बचत गट,तक्षशिला महिला बचत गट,नारी उद्धारक महिला मंडळ,भारतीय बौद्ध महासभा तालुका, शहर,ग्राम शाखा बामणवाडा तालुका राजुरा सर्वच पदाधिकाऱ्री अथक परिश्रम घेत आहेत.पुन्हा असेच शिबीरे राजुरा तालुक्यात राबविण्यात येतील असे आश्वासन आद. धर्मु नगराळे तालुका अध्यक्ष यांनी सांगितले.नंतर शेवटी भारतीय बोैद्ध महासभेच्या नियमानुसार
सरणत्त्य घेऊन कार्यक्रमाची
सांगता करण्यात आली.