Sunday, September 15, 2024
Homeचंद्रपुरभद्रावतीत यंदा वं. राष्ट्रसंतांचा ५२ वा पुण्यतिथी महोत्सव ऑनलाईन

भद्रावतीत यंदा वं. राष्ट्रसंतांचा ५२ वा पुण्यतिथी महोत्सव ऑनलाईन

भद्रावती
वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५२ वा पुण्यतिथी महोत्सव यंदा दि. २६ व २७ डिसेंबर रोजी येथील मुरली पाटील गुंडावार मंगल कार्यालयात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी परिसंवाद ,महिला संम्मेलन, भारुड, राष्ट्रसंत व्याख्यानमाला, स्वर गुरुकुंजाचे ,किर्तन, राष्ट्रसंत विचार चित्रकला स्पर्धा आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्व कार्यक्रमांचे श्री गुरुदेव टी.व्ही. या यु ट्युब चॅनेल वर थेट प्रसारण होणार आहे.


२६ डिसेंबर ला सकाळी ५.०० वाजता शेषानंद पांडे महाराज यांच्या हस्ते श्री गुरुदेव अधिष्ठानाचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात होईल. सकाळी ठीक ९.०० वाजता विद्यार्थ्यांचा परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, परिसंवादात करिता हायस्कूल विभाग ग्रामगीता अध्याय ३६ वा जीवन कला व महाविद्यालयीन विभाग अध्याय क्रमांक १४ ग्राम आरोग्य हे विषय ठेवण्यात आले आहे .दुपारी २.०० वाजता महिला संम्मेलन सौ.पौर्णिमाताई सवाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या प्रसंगी बाल कीर्तनकार कु. साक्षी अतकरे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ७.०० वाजता आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांचा राष्ट्रसंत व्याख्यांमला कार्यक्रम होईल, रात्री ठीक ८.०० वाजता ह.भ.प. निंबाजी महाराज तागड व संच नागपूर भारुड सादर करतील. दि.२७ डिसेंबरला सकाळी ५.३० वाजता सामुदायिक ध्यान व आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांचे चिंतन होईल. ७.०० वाजता रामधून व मनोहर महाराज चौबे यांचे रामधून चे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन होईल. दुपारी १२.०० वाजता ह.भ.प. सुनील महाराज लांजुळकर यांच्या हस्ते कीर्तन व गोपालकाल्याचा कार्यक्रम संपन्न होईल. या प्रसंगी दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. तसेच आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, लक्ष्मणराव गमे, सेवाकराम मिलमिले व अन्य मान्यवरांचे मार्गदर्शन होईल.रात्री ठीक ८.०० वाजता ‘स्वर गुरुकुंजाचे’ हा संगीतमय कार्यक्रम मानव सेवा छात्रालय गुरुकुंज आश्रम मोझरीचे कलाकार सादर करतील. त्यानंतर राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
पुण्यतिथी महोत्सव प्रसंगी राष्ट्रसंत विचार चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा वर्ग १ ते ४ विषय ग्रामगीता अध्याय ३६ वा जीवनकला व ग्रामगीताअध्याय २३ वा सनोत्सव, वर्ग ५ ते ९ करीता ग्रामगीता अध्याय १४ वा ग्राम आरोग्य व ग्रामगीता अध्याय २० वा महिलोन्नती, वर्ग १० ते खुला गट ग्रामगीता अध्याय ३५ वा प्रयत्न प्रभाव व ग्रामगीता अध्याय ९ वा सेवासामर्थ्य या तीन गटांमध्ये घेण्यात येणार आहे.दिलेल्या गटात कोणत्याही एका विषयावर एक फोर साईज ड्रॉईंग शीट मध्ये चित्र काढणे अनिवार्य राहील .चित्र दिनांक २५ डिसेंबर २०२० ला सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत भ्रमणध्वनी क्रमांक ७२१८१५८०९० , ९८५०४९२४०४ यावर संपर्क करून चित्र जमा करावे.महोत्सवा प्रसंगी गरीब व गरजू व्यक्तींना घरपोच नवीन ब्लॅंकेट वितरित करण्यात येणार आहे.५२ व्या पुण्यतिथी महोत्सवा प्रसंगी होणाऱ्या सर्व कार्यक्रमाचे व राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे सर्वांनी घरीच राहून श्री गुरुदेव टी.व्ही. या यु ट्युब चॅनल वर उपस्थित राहून सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळ भद्रावतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular