Monday, June 27, 2022
Homeचंद्रपुरब्रम्हपुरी शहरातील शुक्रवारी बाजार प्रशासनाने पुर्वव्रत बाजार चौकात चालू करावे -

ब्रम्हपुरी शहरातील शुक्रवारी बाजार प्रशासनाने पुर्वव्रत बाजार चौकात चालू करावे –

नगरसेवक सागर सुरेश आमले.

ब्रम्हपुरी: आठवडी बाजार पुर्ववत जुन्या ठिकाणी ( बाजार चौक ) सुरू करन्याय यावे .

ब्रम्हपुरी नगरीच्या अस्तित्वापासुन इथला आठवडी शुक्रवार बाजार हा परंपरागत धुम्मनखेडा वार्ड , जाणी वार्ड , बालाजी वार्ड , सराफा लाईन , टिळक नगर या परिसराच्या मध्यभागात भरत असुन सभोवताल मोठी बाजारपेठ आहे . सदर बाजारपेठ हे प्रत्यक्षपणे शुक्रवार बाजाराशी संलग्नीत आहे . शुक्रवार बाजार हा ब्रम्हपुरीच्या अस्तित्वाचा एक प्रश्न आहे , कारण या बाजाराला जुनी परंपरा लाभलेली आहे . सदर बाजारपेठेवर सभोवतालच्या गावखेडयातुन येणारे किरकोळ विक्रेते , शेतकरी , भाजीपाला विक्रेता , फळ विक्रेता , हॉटेल व्यवसायीक या व्यवसायावर उदरनिर्वाह करणारे अनेक लोक अवलंबुन आहेत . सदर शुक्रवार बाजार हा सभोवतालच्या परिसरातील लोकांना सोईस्कर व फायदेशीर आहे . बाजारासाठी आवश्यक असलेल्या सर्व भौतिक सुविधा , प्रशस्त बाजार संकुलासहीत याठिकाणी सर्व उपलब्ध आहेत . एकंदरीत सदर शुक्रवार बाजार हा अतिशय महत्वाचा विषय असुन सदर बाजार हा नेहमीकरीता सुरू राहावा अशी परिसरातील नागरीकांची , व्यापारांची नम्र मागणी आहे . ———————-आज ज्या ठिकाणी बाजार सुरू आहे ते अतिशय गर्दीचे ठिकाण असुन मातीच्या रस्त्याने धुड, चिखलाचा मोठा त्रास व मोठा महामार्ग लागुन आहे, सदर बाजारपेठेजवळ ब्रम्हपुरीतील नामांकीत अशा शैक्षणिक संस्था संलग्नीत आहेत . त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची दिवसभर वर्दळ असते . म्हणुन बाजार आणि विद्यार्थ्याच्या गर्दीमुळे त्या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही . परत त्याच ठिकाणी बैलबाजार सुध्दा भरतो . सदर जागेत अनेक भौतिक सुविधांचा अभाव आहे . ज्या ठिकाणी मंगळवार बाजार भरतो त्या ठिकाणी पक्के रस्ते नसल्यामुळे धुळीचे प्रदुषन खुप मोठया प्रमाणात होते . पावसाळयात नेहमी चिखल होत असुन त्याचा त्रास नागरीकांना होतो . ब्रम्हपुरी शहराच्या लोकसंख्येचा विचार करता दोन बाजार आवश्यक आहेत . परंतू जुन्या ठिकाणी शुक्रवारी भरत असलेला बाजार हा अत्यावश्यक आहे . जुना शुक्रवार बाजार हा ब्रम्हपुरीच्या प्रतिष्ठेचा विषय आहे . माझ्या माहितीप्रमाणे सदर शुक्रवार बाजाराचा कोणत्याही नागरीकाला त्रास नाही , व्यापारी, ग्राहक व स्थानिक रहिवासी यांना एकमेकांचा कसलाही त्रास नाही . म्हणुन नगरसेवक टिळक नगर ब्रम्हपुरी व रहिवासी धुम्मनखेडा ब्रम्हपुरी या नात्याने आपणांस नम्र विनंती करत आहो की , सदर शुक्रवार बाजार जुन्याच जागेवर सुरू ठेवण्यात यावा व कोणत्याही कारणास्तव तो बंद करण्यात येवू नये अशी माझी नगरसेवक व रहिवासी या नात्याने नम्र विनंती आहे . ———————– वरील समस्यांचे निवेदन मुख्याधिकारी न प ब्रह्मपुरी यांना देतांना, योग्य न्याय न मिळाल्यास आक्रमक आंदोलनाची तयारी भाजपा नगरसेवक श्री सागर सुरेश आमले यांनी दर्शविली आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular