ब्रम्हपुरी:-

सविस्तर माहिती ब्रम्हपुरी शहरात शेष नगर येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक असुन दिनांक ८ आगस्ट रोजी रात्री दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान विदर्भ कोकण ग्रामीण बँक शेष नगर ब्रह्मपुरी येथे काही अज्ञात चोरांनी बँक मध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने शटर चे दोन लोक तोडून तसेच सीसीटीव्ही कॅमेरा तोडून व आलाराम सायरनचा वायर कट करून बँक मध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांच्या प्रसंगावधानाने सदरचा प्रयत्न निष्फळ ठरला पोलिसांनी तात्काळ अज्ञात आरोपी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. सदर परिसरामधील सीसीटीव्ही फुटेज योग्यरीत्या तपासण्यात आले व साक्षीदार व लोकांना विचारपूस करण्यात आली सीसीटीव्ही फुटेज मधील काही ठिकाणी आरोपी तांचा सहवास असल्याचे जाणवले त्यावरून गुप्त बातमी दारा मार्फत व सीसीटीव्ही फुटेज द्वारे अज्ञात आरोपी त्यांचा शोध घेण्यात आला सदर गुन्ह्यातील आरोपी हे माळ डोंगरी चे रहिवासी असल्याचे बातमीदार आन कडून कळल्याने आरोपी क्रमांक एक सचिन पांडुरंग ठाकरे वय 35 वर्ष राहणार मालडोंगरी आरोपी क्रमांक दोन योगीराज मुखरू पोहनकर वय 20 वर्ष राहणार मालडोंगरी हे असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना आज दिनांक 24 8 2019 रोजी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथील पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे व पोलीस शिपाई प्रमोद सावसाकडे व पोलीस हवालदार रामटेके यांनी त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली व आरोपींनी गुन्हा कबूल केल्याचे मान्य केले त्यावरून आरोपींच्या ताब्यातून तोडलेला सीसीटीव्ही कॅमेरा जवळच असलेल्या बोडी मध्ये टाकलेला होता तो आरोपीच्या ताब्यातून घेण्यात आला व पुढील कारवाई करण्यात आली सदरची कारवाई माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक रोशन यादव पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे पोलीस हवालदार रामटेके व पोलीस शिपाई प्रमोद सावसाकडे यांनी अज्ञात आरोपी त्यांचा शोध घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणला व होणाऱ्या मोठ्या घटनेला आळा बसला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे करीत आहे.