Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरब्रम्हपुरी येथे सोन्याची चोरी

ब्रम्हपुरी येथे सोन्याची चोरी

ब्रम्हपुरी : येथील धुमणखेडा येथे राहणाऱ्या अनिल लांजेवार यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी दि. ७ जानेवारीला सोन्याचा ऐवज लंपास केल्याची तक्रार ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन दि ८ जानेवारी ला करण्यात आली .


अनिल लांजेवार हे जय किसान ग्रामीण बिगर शेती सहकारी बिगर शेती पतसंस्था येथे मागील आठ वर्षापासून कमिशन एजंट म्हणून काम करतो दि ७ जानेवारीच्या रात्री खिडकीतून हात टाकून दार उघडले व आतील खोलीतील आलमारीतून एक लाख सतरा रुपयाचा सोन्याचा ऐवज व बँकेचे एक लाख एक्केचाळीस हजार रुपये असा एकून दोन लाख अठ्ठावन हजार रुपये मुद्देमालाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली .

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular