Saturday, June 25, 2022
Homeचंद्रपुरब्रम्हपुरी येथील उपविभागीय कार्यालयावर धडकला विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा…

ब्रम्हपुरी येथील उपविभागीय कार्यालयावर धडकला विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा…

ब्रम्हपुरी :-

विद्यार्थी कृती समिती ब्रह्मपुरी व इतर विविध संघटना मार्फत विद्यार्थी आक्रोश मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात अनेक विद्यार्थी मोठ्या जोमाने सहभागी झाले होते. बरोजगारांना रोजगार द्या, नौकर भर्ती त्वरित करावी सोबतच विविध प्रलंबित व रखडलेल्या भर्त्या त्वरित निकाली काढाव्यात. संपूर्ण सरळसेवा पदे mpsc मार्फतीने घ्यावे, शिक्षक भर्ती, पोलीस भरती, महापरेशन भर्ती त्वरित कराव्या, ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण करून MIDC ची स्थापना करावी, आमदार, खासदार यांचे वेतन व भत्ते कमी करून बेरोजगारांना भत्ता देण्यात यावा. अश्या विविध मागण्यांसाठी आज दुपारी 12 वाजता, आवाज दो, हम एक है, रोजगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, ….बबलीचे बाबा काय म्हणते, बेरोजगार नवरा नाही म्हणते… असे विविध नारे देत विद्यार्थ्यांचा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. या मोर्च्याच्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकार विरुद्ध विद्यार्थ्यांचा रोष दिसून आला. नौकर भर्ती न केल्यास विद्यार्थ्याच्या असंतोषाचा बॉम्ब केव्हाही फुटू शकतो. असे भाकीतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

सदर मोर्च्यातील प्रमुख मागण्या :-
1) सरळ सेवा पदभरती नव्याने सुरू करावी.
2) एमपीएससी व इतर परीक्षा नियमित घ्याव्यात.
3) 2010 पासून रखडलेल्या शिक्षक भरतीला मान्यता देऊन त्वरित पदभरती करावी.
4) आमदार व खासदार यांचे पेन्शन व इतर भत्ते रद्द करून त्या निधीचा वापर बेरोजगार भत्ता देण्यासाठी करावा.
5) विविध सहकारी संस्थांचे होत असलेले खासगीकरण थांबवावे व खाजगीकरण झालेल्या संस्थानचे पुन्हा राष्ट्रीय करण करावे.
6) ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण करावा व एम आय डी सी ची स्थापना करावी.
7) परीक्षा शुल्क व शिक्षण फी कमी करावी.
8) जिल्हा निवड समिती रद्द करून परीक्षा एमपीएससीमार्फत घ्यावी.
9)विद्यापीठाचे परीक्षा शुल्क व इतर शुल्क यांची जबाबदारी शासनाने घ्यावी.
10) देशात वाढत असलेल्या महागाईवर नियंत्रण आणून ती कमी करण्यासाठी उपाययोजना करावी.
11) रखडलेली पोलीस भरती व महापारेषण भरती त्वरित करण्यात यावी.
12) एमपीएससी च्या मुलाखती त्वरित घेण्यात याव्या.

सदर मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रा.बालाजी दमकोंडावार अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, श्री नामदेवराव जेंगठे मार्गदर्शक, रोजगार संघ ब्रह्मपुरी, श्री प्रशांत डांगे सामाजिक कार्यकर्ता ब्रम्हपुरी, श्री सुरज मेश्राम अध्यक्ष युथ क्लब ब्रह्मपुरी, श्री सुदाम राठोड जिल्हाध्यक्ष विदर्भ राज्य युवा आघाडी, श्री नरेश रामटेके तालुका अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन ब्रह्मपुरी, श्री पद्माकर रामटेके सामाजिक कार्यकर्ता ब्रह्मपुरी, प्रा. लक्ष्‍मण मेश्राम अध्यक्ष, रोजगार संघ ब्रह्मपुरी, श्री सतीश डांगे तालुकाध्यक्ष जुनी पेन्शन हक्क संघटना ब्रह्मपुरी, श्री उदय पगारे सामाजिक कार्यकर्ता ब्रह्मपुरी, श्री सुमेध वालदे सामाजिक कार्यकर्ता ब्रह्मपुरी,श्री रोशन मेंढे सामाजिक कार्यकर्ता ब्रह्मपुरी, श्री विवेक रामटेके, श्री निकेश तोंडरे, श्री अरविंद नागोसे , कुंदन लांजेवार, श्री खुशाल वाकोडीकर, देवानंद ठाकरे प्रा. संजय चव्हाण आदी सामाजीक कार्यकर्ते यांनी प्रामुख्याने सहभाग नोंदवला होता.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular