Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरब्रम्हपुरी पोलीसांच्या विशेष पथकाने अवैध देशी दारुचा साठा केला जप्त

ब्रम्हपुरी पोलीसांच्या विशेष पथकाने अवैध देशी दारुचा साठा केला जप्त

ब्रम्हपुरी:-
ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन अंतर्गत गठीत करण्यात आलेले विशेष पथक सक्रियपणे कार्यरत आहे.विशेष पथकाने ब्रम्हपुरी तालुक्यातील खेड येथे टाकलेल्या धाडीत 36 हजार रुपयांचा अवैद्य दारुसाठा जप्त केला आहे.
ब्रम्हपुरी पोलीसांचे विशेष पथक हे गस्तीवर असतांना त्यांना गोपनीय माहिती मिळाली कि, ब्रम्हपुरी तालुक्यातील खेड मक्ता येथील तलावाच्या बाजुला अवैद्यपणे विक्री करण्यासाठी दारुसाठा लपवून ठेवलेला असुन सदर दारुसाठा विक्रीसाठी इतरत्र पाठविण्यात येणार आहे.


सदर माहीतीवरुन विशेष पथकाने सापळा रचत खेडमक्ता येथील तलावाजवळ धाड टाकली असता 36 हजार रुपयांचा अवैद्य दारुसाठा सापडुन आला.यातील आरोपी संदीप उर्फ कटप्पा हिरामण गुरपुडे (वय २८ वर्ष) रा. खेड(मक्ता) याच्या वर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ई अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिलींद शिंदे, पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर, पोलीस हवालदार नरेश रामटेके, मुकेश गजबे, प्रकाश चिकराम, प्रमोद सावसाकडे यांनी केली आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular