Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरबोथली येथे 'घरकुल मार्ट' चे उदघाटन

बोथली येथे ‘घरकुल मार्ट’ चे उदघाटन

सावली:(बाबा मेश्राम):::-जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील बोथली येथे ‘ घरकुल मार्ट’ चे नुकतेच उदघाटन करण्यात आले.तालुक्यातील बोथली येथील उडान महिला ग्रामसंघ यांनी सुरुवात केली. या समूहाला उमेद अभियानातून निधी मंजूर उपलब्ध आला.


यावेळीआयोजित सदर कार्यक्रमाच्या उदघाटनाला निखिल गावंडे संवर्ग विकास अधिकारी, विजय कोरेवर प.स.सभापती उपस्थिती होती.तसेच बोथली गावाच्या सरपच्या खलिता मराठे, अशोक शिंदे ग्रामविकास अधिकारी, ज्यांना घरकुल मार्ट चा लाभ झाला असे सर्व ग्रामसंघाचे पदाधिकारी, कर्मचारी सर्व कॅडर उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular