Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरबावळी विहीरीसाठी पुरातन प्रेमीचे आंदोलन --:: कवडू लोहकरे यांचे नेतृत्व

बावळी विहीरीसाठी पुरातन प्रेमीचे आंदोलन –:: कवडू लोहकरे यांचे नेतृत्व


चिमूर प्रतिनिधी /
चिमूर–:: चिमूर तालुक्यातील प्राचिन विहीरी मुळे चिमुर तालुक्याला वैभव प्राप्त झाले. या विहीरी च्या संवर्धनाची जबाबदारी पुरातन प्रेमीनी आपल्या खांद्यावर घेतली. काळाच्या ओघात चिमुर तालुक्यातील प्राचिन पाय -याच्या बावळी विहीरी संकटात सापडल्या असुन चारही विहीरीचे अस्तित्व धोक्यात आहे. चिमुर तालुक्यातील बावळी विहीरी मुळे इतिहासात मोलाची भर पडली आहे.

या चारही विहीरी च्या संवर्धन होण्यासाठी पुरातन प्रेमीचकडुन कोलारा( तु) पाय-याच्या बावळी विहिरीवर आंदोलन करण्यात आले. पुरातन प्रेमी कडुन पुरातन विभागाला वारंवार निवेदन देऊन ही विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे चारही बावळी विहीरी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. चिमूर तालुक्यातील कोलारा तु, गडपिपरी, तिरखुरा रोडवरील बावळी विहीर, पिंपळनेरी या चारही विहीरी इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. या विहीरीचे दगडं निघाले आहेत. या विहीरी वर कोरीवकामाचे व मजबुती चे उत्तम उदाहरण आहे. पूर्वजांचा मौल्यवान इतिहास वाचविण्यासाठी पुरातन प्रेमी कडुन आंदोलन करण्यात आले

यावेळी पुरातन प्रेमी कवडू लोहकरे, सुशांत इंदोरकर, ऋषिकेश बाहुरे, मोहन सातपैसे विशाल बारस्कर व पर्यटक उपस्थित होते.

पुरातन प्रेमी कवडू लोहकरे यांचे मत
“” आजही या विहीरीचा उपयोग शेतकऱ्यांच्या शेतात पाणी करण्यासाठी होत आहे. पुरातन विभागाने लक्ष न दिल्यास आंदोलन उग्र करु “”

कवडू लोहकरे
पुरातन प्रेमी चिमूर

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular