Monday, June 27, 2022
Homeचंद्रपुरबल्लारपूर शहरात 2 युवकांनी केली आत्महत्या :

बल्लारपूर शहरात 2 युवकांनी केली आत्महत्या :

एकानी हरपिक पिले तर दुसऱ्यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरात विविध कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्याचे सतत वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे नुकतीच बल्लारपूर शहरात किल्ला वॉर्ड बल्लारपूर येथे भगतसिंग रामसिंग बैस यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली अवघ्या 2 दिवसांपूर्वी एका 12 वर्षीय निरागस मुलीचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाला ती शाई वाळते न वाळते तोच आज बल्लारपूर शहरातील दोन विविध वॉर्डात 2 तरुणांनी आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे.


सूत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी 8:00 वाजताच्या सुमारास बालाजी वॉर्ड निवासी असलेले स्व नरसय्या येनगन्धलावार (नगरसेवक) यांच्या आजारपणामुळे झालेल्या मृत्यूमुळे वडिलांच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यामुळे त्यांचा मुलगा राजू नरसया येनगन्धलावार वय – 28 वर्ष यांनी घराच्या बाथरूम मध्ये हार्पिक पिऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे तर दुसऱ्या घटनेत रवींद्र वॉर्ड बल्लारपूर येथील शुभम राजू बहुरीया वय – 26 वर्ष आपल्या आईला घराच्या वरच्या खोलीत झोपायला जायचे कारण सांगून गेला असता खोलीत दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला असल्याची माहिती आज सकाळी 8 :00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली या दोन्ही घटनांचा तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे मात्र अलीकडील काही दिवसात तरुण मुलांच्या आत्महत्या मुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular