पहिली लस वेकोली महाप्रबंधक सभ्यासाची डे यांनी घेतली

बल्लारपूर :- वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्राच्या रुग्णालयात 15 मार्चपासून कोरोनाच लसीकरण वेकोली बल्लारपूर चे महाप्रबंधक श्री सभ्यासाची डे यांच्या हस्ते सुरुवात झाली तसे पहिली लस घेण्याचा मानही महाप्रबंधकाना मिळाला या लसीकरणानंतर बोलतांना महाप्रबंधक म्हणाले की, या ठिकाणी देण्यात येणारी लस ही पूर्णपणे सुरक्षित असून लस ही मोफत देण्यात येत आहे तसेच या लसीकरणाचा वेकोली मुख्यालयात कार्य करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी व सर्व बांधवांनी लाभ घ्यावा आणि कोरोना या विषाणूजन्य आजारापासून आपल्या जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला समूळ पणे नष्ट करण्यात मदत करावी तसेच या लसीकरणासंदर्भात कोणत्याही शंका कुशंका ना वाव देऊ नये अशा प्रकारचे आवाहन वेकोली महाप्रबंधक सभ्यासाची डे यांनी केले आहे या निमित्ताने सदर कार्यक्रमात क्षेत्राचे आरोग्य अधिकारी डॉ ओवेश अली, महाप्रबंधक निदेशक सी.पी.सिन्हा, क्षेत्राचे कार्मिक प्रबंधक समीर बारला, डॉ.चंद्रशेखर, डॉ जगदीश, कडोली प्राथमिक स्वास्थ प्रमुख विपीन कुमार, बोडाराम रघू आणि त्यांची चमू, विवेक अल्लेवार, शिवपूरम रामलू, टी.जी.पाटील, रामचंद्र ई उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन मैथन शशी मसीह यांनी केले यावेळी आरोग्य कर्मचारी सह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.