Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरप्रहार शिक्षक संघटना शाखा - वरोरा व भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमानाने LIC...

प्रहार शिक्षक संघटना शाखा – वरोरा व भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमानाने LIC कार्यालय वरोरा यांना शिक्षकांच्या समस्यांचे संदर्भात निवेदन .*

वरोरा : LIC शाखा व्यवस्थापक यांना निवेदन देताना श्री.पवनकुमार शर्मा, श्री शंकर मीरे,श्री मोरेश्वर विद्दे व प्रहार शिलेदार


प्रहार शिक्षक संघटना शाखा वरोरा व भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमानाने माननीय शाखा व्यवस्थापक भारतीय जीवन बीमा निगम शाखा वरोरा यांना शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून कपात झालेली रक्कम वेळेवर जमा न होणे, चुकीचे पाॕलीसी नंबर वर जमा होणे,
तसेच मासिक वेतानातुन कपात झालेले एलआयसी रक्कम व पॉलिसी क्रमांक तपासून खातेदारांच्या खात्यात योग्यरीत्या नोंदणीबाबत तसेच एलआयसी क्रमांक चुकीची असल्यास शिक्षण विभाग पंचायत समितीच्या निदर्शनास आणून देणे या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व यावर माननीय साळगावकर साहेब शाखा व्यवस्थापक भारतीय जीवन बीमा निगम शाखा वरोरा यांनी सर्व अडीअडचणी वर योग्य मार्गदर्शन करून शिक्षकांच्या सर्व समस्यांवर योग्य त्या उपाययोजना करून त्यावर योग्य ती अंमलबजावणी तात्काळ करण्यात येईल अशी ग्वाही दिली . यावेळी प्रहार शिक्षक संघटना शाखा वरोरा व प्रहार शिक्षक संघटना शाखा भद्रावती तर्फे तालुकाध्यक्ष श्री पवनकुमार शर्मा व भद्रावती चे तालुकाध्यक्ष श्री शंकर मीरे सर व भद्रावती चे कार्याध्यक्ष श्री गुजरकर सर ज्येष्ठ उपाध्यक्ष प्रभाकर मेंगरे सर, विरले सर ,चंदनखेडे सर, तसेच नानाजी कुळसंगे सर यांची उपस्थिती होती.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular