Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरप्रहार च्या मघ्यास्थीने मजूर चे वेतन मिळाले .

प्रहार च्या मघ्यास्थीने मजूर चे वेतन मिळाले .

कंपनीच्या मुख्य गेट समोर मजूर वर्गाचा ठीय आंदोलन .

उर्वरित वेतन १० दिवसात देणार .

शेगांव बू –

वरोरा चिमूर चार पदरी रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सदर एस आर के कंत्रक्षण कंपनी कडे असून या कंपनीचे मुख्य अधिकारी श्री प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली हे काम जलद गतीने सुरू असून रस्त्याच्या कामाला गती प्राप्त झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.


परंतु रस्त्यावरील पुल , नाली बांधकाम मजुरांचे गेल्या चार महिन्यांपासून पगार वेतन न मिळाल्याने या मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली असुन कुटुंबाचे पालन पोषण करणे अश्यक्य. होत असल्याने आपल्या घामाचा पैसा. मजुरीचा पैसा तात्काळ देण्यात यावा या करिता सदर एस आर के कंपनी च्या मुख्य मार्गावर ठिय्या आंदोलन पुकारून आपल्या मजुरीची मागणी या मजुरासह प्रहार जन शक्ती पक्ष च्या कार्यकर्त्यांनी केली होती . उन्हातानहात दिवस भर कष्ट करणाऱ्या गोर गरीब मजुर वर्गाचा पगार वेतन न देत असल्याने स्थानिक प्रहरच्या कार्यकर्त्यांनी मोठा तांडव करून एस आर के कंपनी च्या सर्व पदाधिकारी यांना तात्काळ ठिया आंदोलन स्थळी बोलावून प्रत्यक्ष मजूर व कंपनीच्या कर्मचऱ्यांनी बात चीत केली असता .


कंपनीचे मुख्य अधिकारी श्री प्रसाद यांनी ह्या मजूर वर्गाचे पगार शिल्लक असल्याचे माहित नसून त्यामुळे हे यांचे पगार रखडले असावेत असा अंदाज व्यक्त करून. सर्वस्वी सर्व प्रकरणाची अधिक माहिती गोळा करून या मजुरांना आंदोलन स्थळी लाख रुपये देऊन उर्वरित संपूर्ण रक्कम १० दिवसाच्या अगोदर देण्यात येईल अशे आश्वासन देऊन मजुरांनी तसेच प्रहार जन शक्ती पक्ष् च्या कार्यकर्त्या नी यांच्या विनंतीला मान ठेऊन आंदोलन उठवण्यात सांगितले . विशेष म्हणजे शेगाव येथील जन शक्ती पक्ष च्या कार्यकर्त्यांमुळे गोर गरीब मजुर वर्गाना न्याय मिळाल्याने मजूर वर्गांची प्रहारचे मनापासून कौतुक केले हे मात्र विशेष .
इतकेच नव्हेतर येत्या १० दिवसात या मजुरांचे संपूर्ण रक्कम पगार न केल्यास या पेक्ष्याही मोठे आंदोलन पुकारण्यात येईल अशी तंमी प्रहार पक्ष यांनी देली ..
यावेळी प्रहार चे. कार्यकर्ते श्री. अक्षय बोंदगुलवार. शेर खान पठाण , राकेश भूतकर. अनिल जाधव , सलीम पठाण , व अन्य कार्यकर्त्यांसह कंपनीचे मुख्य अधिकारी तसेच सर्व कर्मचारी हजर होते

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular