हिंगणघाट:- येथे तहसील कार्यालयासमोर २० जानेवारी पासून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रहारचे रुग्णमित्र तथा जिल्हा संपर्कप्रमुख गजु कुबडे व जिल्हा प्रमुख जयंत तिजारे यांचेसह अनेक शेतकरी व प्रहारचे कार्यकर्ते उपोषणाला बसले होते.

सी.सी.आय चे चुकारे सेविंग खात्यात जमा करण्यात यावे, यासाठी हिंगणघाट येथील बँक ऑफ महाराष्ट्र ने शेतकऱ्यांनकडून सक्तीने वसूल केलेले अतिरिक्त व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा न करता ते पैसे कर्जात वळते करण्यात आले . या मागणी करीता उपोषण करीत होते .
उद्या पासून विना पानी उपोषण करण्याचा पवित घेतल्याने प्रशासनाला जाग आली. उपोषणाला येथील उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी सायंकाळी ७:३० ला भेट घेऊन मिटिंग लावली यावेळी वर्धा येथील एल.डी. एम. वैभव लहाने व बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापक श्री. देव यावेळी उपस्थित होते.एल.डी. एम.वैभव लहाने यांनी दोन्ही मागण्या तात्काळ मान्य करीत अतिरिक्त व्याजाची रक्कम ३ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची लेखी हमी दिली.तसेच
सी.सी.आय कडून मिळणारा चुकारा हा कर्ज खात्यात वळता झाला तरी तो चुकारा सेविंग खात्यात वळता करून शेतकऱ्यांशी चर्चा करूनच सामोरील कार्यवाही करू असे लेखी आश्वासन दिले.
त्यामुळे रुग्णमित्र- गजु कुबडे यांनी हे आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याचे जाहीर केले यावेळी उपविभागीय अधिकारी चंद्रभानजी खंडाईत यांनी रुग्णमित्र गजु कुबडे व त्यांच्या सहकाऱ्यांना ऊसाचा रस पाजून आंदोलन सोडले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख जयंत तिजारे, हिंगणघाट तालुका प्रमुख जगदिश तेलहांडे, वर्धा जिल्हा रुग्णसेवक विनोद खंडाळकर, समुद्रपुर तालुका प्रमुख प्रमोद म्हैसकर,कांढळी सर्कल प्रमुख शैलेश झाडे,सुरज कापसे,सुरेश कापसे, कामडी,नितीन क्षीरसागर,राजू रुपारेल,गोपाल मांडवकर,जाम येथील उपसरपंच अजय खेडेकर,हनुमान हुलके व अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते.