Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरनोकारीच्या आशा वर्करवर जीवघेणा हल्ला !

नोकारीच्या आशा वर्करवर जीवघेणा हल्ला !


* आशा वर्कर संघटनेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन
गडचांदूर : नोकारी खुर्द येथील आशा वर्कर संगीता जयप्रकाश ठाकरे या आपल्या गावात करोना सर्वेक्षण व इतर शासकीय काम करीत असताना 6 ऑगस्ट 2021 रोजी गावातील एका गाव गुंडाने तिला शिवीगाळ करून जीवघेणा हल्ला केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी व गुन्हेगाराला कठोर शिक्षा तातडीने झाली पाहिजे म्हणून जिल्ह्यातील आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांनी वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन दिले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांनी 7/8/2021 रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करून जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले. राजुरा, बलारपुर, चंद्रपूर व भद्रावती तालुक्यातील तसेच सर्व शहरी आशा वर्कर जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपस्थित झाल्या. कोरपना तालुक्यातील सर्व आशा वर्कर व गट प्रवर्तक यांनी गडचांदुर येथील पोलिस स्टेशनला व उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन दिले. उर्वरित तालुक्यात सर्व आशा वर्कर व गट प्रवर्तक यांनी आपापल्या तालुक्यात पोलिस स्टेशनला निवेदन दिले.
कॉ. विनोद झोडगे जिल्हा अध्यक्ष आशा वर्कर, गट प्रवर्तक संघटना संलग्न आयटक चंद्रपूर यांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular