Sunday, May 29, 2022
Homeचंद्रपुरनिमणी गावं शंभर टक्के कोविड लसीकरण करण्याचा संकल्प

निमणी गावं शंभर टक्के कोविड लसीकरण करण्याचा संकल्प

उपसरपंच उमेश राजूरकर
निमणी येथे लसीकरण शिबीर
११० नागरिकांनी घेतली लस
अंबुजा फाउंडेशनचे विशेष सहकार्य

गडचांदुर:- मो.रफिक शेख -कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत माझें गावं शंभर टक्के कोविड लसीकरण पूर्ण करण्याचा संकल्प निमणी ग्रामपंचायतचे उपसरपंच उमेश राजूरकर यांनी केला ते ग्रामपंचायत निमणी व अंबुजा सिमेंट फाउंडेशन उप्परवाही यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत निमणी येथे २५ ऑगस्ट रोज बुधवारला सकाळी १० वाजता कोविड लसीकरण शिबिराचे उदघाटन केले त्यावेळी ते उदघाटक म्हणून बोलत होते.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सीमा जगताप प्रमुख पाहुणे वैद्यकीय अधिकारी आर जी बावणे आरोग्य सहायक पी बी खामनकर ग्रामसेवक एस डी ढवळे सी एच ओ स्वेता देवगडे आरोग्य सेवक डी के दडमल आरोग्य सेविका ए आय पडवेकर आशा गटप्रवर्तक सविता जेणेकर अंगणवाडी सेविका सोनल राजूरकर कांता टेकाम प्रक्षेत्र अधिकारी शंकर आत्राम अशोक झाडे अतुल धोटे शकुंतला पोयाम नेहा जगताप आदी उपस्थित होते.
पुढे राजूरकर म्हणाले की ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत असलेला गैरसमज दूर करून त्यांना जागृत करून लसीकरणासाठी प्रवृत्त करणे आरोग्यासाठी फार महत्त्वाचे आहे असे सांगितले.
वैद्यकीय अधिकारी डॉ बावणे म्हणाले की प्रत्येक नागरिकांनी कोरोनाची लस घेणे आवश्यक आहे तसेंच प्रत्येकांनी हात स्वच्छ धुने मास्क वापरणे सामाजिक अंतर ठेवणे व गर्दीत जाणे टाळावे असे सांगितले
ग्रामपंचायत निमणी कडून प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा यांच्याकडे २०० लसीची मागणी केली होती पण राज्यात लसीचा तुटवडा असल्याने कोरोनाचे नियम पाळून हिरापूर व निमणी येथील ११० नागरिकांना लस देण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते शिबिराच्या यशस्वीतेसाठी आशा वर्कर चंदा टोंगे सी आर पी सरिता नगराळे शीला टोंगे प्रफुल मोरे भीमराव टेकाम गोपिका टोंगे व अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही यांनी सहकार्य केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular