Monday, June 27, 2022
Homeचंद्रपुरनान्होरी येथे तिनदिवसीय योगप्राणायम शिबिर संपन्न

नान्होरी येथे तिनदिवसीय योगप्राणायम शिबिर संपन्न

ब्रम्हपुरी : ज्याप्रमाणे मानवाला मनशांतीसाठी अध्यात्म त्याचप्रमाणे शरीरशुद्धी व निरोगी निरामय जीवनासाठी योगप्राणायम आवश्यक आहे.

याच भावनेने प्रेरीत पतंजलि योग समिती ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपुर चे वतिने कौतुकबाबा देवस्थान नान्होरी तालुका ब्रम्हपुरी येथे भागवत सप्ताहाच्या निमित्ताने तिनदिवसीय निशुल्क योग प्राणायम शिबीराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी निरोगी, स्वस्थ, व रोगमुक्त तथा रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी योग प्राणायाम आवश्यक आहे असे भगवान पालकर जिल्हा प्रभारी पतंजलि योग समिती यांनी संबोधित केले , नरेश ठक्कर तहसिल प्रभारी यांनी योगसंदेश घरोघरी पोहचविण्याचे व गावोगावी निशुल्क योगवर्ग सुरू करण्याचे उपस्थितांना आवाहन केले. , डॉ. नरेश बावनकुळे तालुका प्रभारी चिकित्सक यांनी स्वच्छता व निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक नियमांची माहिती दिली. रुद्राक्ष राऊत यानी सुध्दा लोकांना योगाचे धडे गिरविले. शिबिरातील उत्कृष्ठ सहभागाबद्दल कु.योगेश्वरी, कु.तन्वी, दिनेश डोर्लीकर, यशवंतराव भांडारकर यांना योग संजीवनी पुस्तिकेचे वितरण करून भगवान पालकर यांनी सन्मानीत केले.योग शिबीर यशस्वी होण्यासाठी ह.भ.प.बाळकृष्ण तलमले महाराज, यशवंतराव भांडारकर, दिनेश डोर्लीकर, पुंडलीक ठाकरे, रमेश ठाकरे, पांडुरंग जमनकर, जिवन कोलते, जागोजी कोलते यांचा सहभाग लाभला.शिबिराला शालेय विद्यार्थी , महाविद्यालयीन तरूण – तरूणी तद्वतच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular