Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरनवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

ब्रम्हपुरी /प्रतिनिधी :-

ब्रम्हपुरी तालुक्यातील रुई येथिल नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच सौ कल्पना नानाजी तुपट व नवनिर्वाचित उपसरपंच ध्यानेश्वर महादेव बुल्ले व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य बेलपाथली येथिल सामाजिक कार्यकर्ते मनोहर भर्रे,उत्तम वाघुजी बनकर,सौ. रीना हरिदास निहाते यांनी तालुका काँग्रेस कार्यालय येथे तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, जी. प. सदस्य प्रा. राजेशजी कांबळे, प्रमोदभाऊ चिमुरकर, न. प बांधकाम सभापती तथा गटनेता विलास विखार सौ सुचित्राताई अण्णाजी ठाकरे अण्णाभाऊ ठाकरे, देवचंद ठाकरे, सुखदेव बनकर, विलास धोटे याच्या उपस्थित आज तालुका काँग्रेस कार्यालय ब्रम्हपुरी येथे प्रवेश केला. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वत ठाम विश्वास ठेऊन भविष्यामध्ये त्याच्या सोबत काम करण्याची व गावाच्या सर्वागिन विकास करण्याचा निर्धार ठेऊन काँग्रेस पक्षात युवा नेतृत्वला प्राध्यान्य दिला आहे. प्रथमच रुई ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बेलपाथली येथिल सौ. कल्पना नानाजी तूपठ यांना सरपंच व उपसरपंच ध्यानेश्वर बुल्ले यांना उपसरपंच बनण्याची संधी नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी दिली आहे. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना पुढील वाठचालीसाठी मदत व पुनर्वसन तथा जिल्हाचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular