Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरनदिपात्रात उडी घेऊन इसमाची आत्महत्या

नदिपात्रात उडी घेऊन इसमाची आत्महत्या

ब्रम्हपुरी-
एका इसमाने मद्यपान करून नदीपात्रात उडी मारत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 11 वाजता च्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील सोनेगाव गावानजीकच्या वैनगंगा नदीपात्रात घडली आहे.


आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव सुरेश केशव बावणे (वय ५० वर्ष) रा. सोनेगाव तह. ब्रम्हपुरी असे आहे.
प्राप्त माहीतीनुसार ब्रम्हपुरी तालुक्यातील सोनेगाव सुरेश बावणे हा मद्यपी अवस्थेत सोनेगाव नजीकच्या वैनगंगा नदीकाठावर गेला होता असे घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले. व त्यानंतर नदीपात्रातील वाहत्या पाण्यात त्याने उडी घेतली. घटनेची माहीती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गेडाम, अरूण पीसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी उपस्थित नागरिकांकडुन घटनेची माहिती घेतली. व सदर बाब आपत्ती व्यवस्थापन कक्ष चंद्रपूर येथे कळवली. शोधमोहीमेसाठी बोटिची मागणी केली.आज बोट घेऊन सुरेश बावणे याचा शोध घेणे सुरू आहे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular