(सिंदेवाही- भगवंत पोपटे)
सिंदेवाही ग्रामपंचायतचे रुपांतर सन २०१६ ला नगरपंचायत मध्ये झाले असून, नगपंचायतची दुसरी सार्वत्रीक निवडणूक ऑक्टोबर २०२१ मध्ये होऊ घातली असून शहराप्रती नगर प्रशासनाचे उदास धोरन व अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे सर्वश्रुत आहे. चंद्रपूर नागपूर ह्या मुख्य मार्गालगत कांही व्यापाऱ्यांची प्रतिष्ठाने असून, त्यांनी तर कारगाटा तलावाचे नहराचा अप्रोच रोडच गिळंक्रुत केला असल्याचे जानवत आहे. सदर नहर हा शेतकऱ्यांचे धानपिकासाठी पाणीपूरवठा करण्याचे स्त्रोत असून, नहर चंद्रपूर- नागपूर महामार्गाने गेला असून सिंदेवाही नगरपंचायत हद्दीतून गेलेला आहे. नहराचे देखभालीसाठी २० फुट रुंदीचा अप्रोच रोड असतांना दुकानदारांनी त्या रोडवरच कब्जा केला आहे. त्याचेवर कळस म्हणून, एका ग्यास वेल्डींग दुकानदाराने नहराचे अप्रोच रोडलाच ताब्यात घेऊन, त्याचे सिमेंटीकरण करूण दुकाणासाठी त्याचा वापर करून, नहरावरून सुद्धा पेंडाल टाकून राज्यमहामार्गावर सुद्धा अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास येत आहे. तरीपण संमंधीत अतिक्रमणाकडे सिंदेवाही नगरप्रशासनाचे हितपूर्वक दुर्लक्ष होत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

सिंदेवाही नगरपंचायत ला स्त्रि, पुरूष असे मिळून २१ स्थाई कर्मचारी कार्यरत आहेत. अनेक रोजंदारीवर काम करणारे कामगार आहेत. तसेच नगरपंचायत चे पदाधिकारी, नगरसेवक यांची संख्या १७ असून, प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी कार्यरत आहेत. येवढे मनुष्यबळ असतांना शहरातिल समस्यांकडे दुर्लक्षच होत असल्याचे बघायला मिळत आहे. अदलून बदलून कायम सत्तेत असलेल्या नगरसेविकेचे पतीचे जनरल स्टोअर्स सिद्धार्थ चौक सिंदेवाही येथे असून,पोलिस स्टेशन ते बाजाराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर आहे, दुकानाचे घरमालक मेश्राम यांचे अतिक्रमणामूळे नालीचे बांधकाम अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. नगरपंचायत पदाधिकारी, मख्याधिकारी हे अतिक्रमीत जागेवर येऊन चौकशी करून गेले. परंतू अजूनही अतीक्रमण हटवून नालीबांधकाम पुर्ण झालेले नाही. त्यासाठी विरोधी पक्षाचे गटनेते दिवाकर पुस्तोडे यांनी पक्षाचे नगरसेवकांना सोबत घेऊन पत्रकार परिषद घेऊन नगरपंचायत ला अतिक्रमण हटविण्यास निवेदन दिले. परंतू नगरपंचायत प्रशासनाने विरोधी पक्षाचे गटनेत्याने दिलेल्या निवेदनाला केराची टोपली दाखवीली गेली. त्यामुळे नगर प्रशासनाचे शहरातील समस्यांवर कीती लक्ष आहे याची प्रचिती आल्यावाचून राहात नाही.