घुग्यूस प्रतिनिधी–
आज झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपाचे किरण बांदूरकर यांनी 9 मते घेऊन विजयी तर महाविकास आघाडीच्या उमेदवार ममता मोरे यांना 3 मते मिळाली.

उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपाचे मंगेश राजगडकर यांनी निवड झाली आहे त्यांना 9 मते मिळाली तर महाविकास आघाडीच्या उमेदवार अरुणा पटेल यांना 3 मते मिळाली.
सरपंच पदा साठी किरण बांदूरकर, ममता मोरे, हेमा ताला व प्रभाकर लिंगमपेल्ली या चार उमेदवारांनी अर्ज दाखल केला.
परंतु निवडणुकी दरम्यान प्रभाकर लिंगमपेल्ली हे गैरहजर होते तर हेमा ताला यांनी आपला उमेदवारी अर्ज वापस घेतला.
उपसरपंच पदा साठी मंगेश राजगडकर, कंप्पा राजय्या व अरुणा पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु कम्पा राजय्या यांनी आपला उमेदवारी अर्ज वापस घेतला.
सरपंच पद हे सर्वसाधारण साठी राखीव होते. या सदस्य संख्या 13 असून एकूण 5 वार्ड आहे.
अध्यासी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी किशोर नवले, तलाठी दिलीप पिल्लई, ग्रामविकास अधिकारी रवींद्र चावरे, ग्रामपंचायत कर्मचारी आनंद मेंढे, दीपक घोडम, आशिष उरकुडे, संतोष सातपुते व डांगे यांनी काम पहिले.