खापा- मौजे नंदापुर तालुका सावनेर येथे स्मार्ट कॉटन प्रकल्पाअंतर्गत पुणे आयुक्त स्तरावरून महेश वैद्य तंत्र अधिकारी अमोल माने यांनी नंदापुर येथील स्मार्ट कॉटन प्रकल्पाला भेट दिली.
गट प्रमुख यांनी शेतकरी यांच्यासोबत चर्चा घडून मार्गदर्शन करण्यात आले. भेटीदरम्यान त्यांनी स्मार्ट कॉटन अंतर्गत गावामध्ये केलेल्या गटाला व गटप्रवर्तक यांच्यासोबत स्मार्ट कॉटन बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली प्रकल्पात आपल्या गावाचा कापूस एकत्रित आणून त्या कापसाला स्मार्ट काटन कसे बनवायचे याबाबत माहिती दिली सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गटाचा कापूस एकत्रित करून महा काटन मार्फत जिनिंग मध्ये नेऊन त्यांच्या गाठी तयार करून त्या बनविलेल्या गाठीचा स्मार्ट ब्रँड तयार करून व सरकी तयार करून कशाप्रकारे आपला स्मार्ट ब्रँड आपणास तयार करून सीसीआई च्या माध्यमातून जर विकता येईल तर आपल्या शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढवता येईल याबाबत माहिती दिली. यावेळी कृषी पर्यटक रोशन डंभारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. तर संचालन कृषी सहाय्यक स्वाती सुरकार यांनी केले यावेळी प्रकल्प उपसंचालक अनील खरपुरीये. नंदापुर सरपंच मनोज बनसोड तसेच समाविष्ट प्रकल्प शेतकरी गंगाधर पाटील दिवाकर ढोके. शांताराम कोमटे. कमलाबाई नागपूरकर गंगाधर वानखडे वासुदेव मोरेकर . विनायक ढोबळे तुळशीदास पाटील व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते