Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरधावत्या कार ने घेतला पेट

धावत्या कार ने घेतला पेट


ब्रम्हपुरी प्रतिनिधी :- शहरापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर ब्रम्हपुरी वरून नागपूर कडे जाणाऱ्या धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना रात्रो ८ च्या दरम्यान उघडकीस आली.


सविस्तर वृत्त कि सतीश प्रभाकर पोपटटीवार वय (३५) रा. नागपूर हे आपल्या परिवारा सहित स्वीप्ट डिझायर कार क्र. MH ३४ K ८४७७ ने ब्रम्हपुरी कडून नागपूर कडे जात असतांना ब्रम्हपुरी येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर त्यांच्या धावत्या कार ला अचानक आग लागली वाहनचालक सतीश पोपटटीवार यांना गाडीला आग लागल्याचे लक्षत येताच समय सूचकता दाखवून गाडीत थांबवून गाडीत असलेल्या परिवारातील ३ सदस्यांना बाहेर काढले रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी अग्निशामक दलाला पाचारण केले अग्निशामक येई पर्यंत आगेने रौद्र रूप धरण केले होते त्या भयंक आगीत कार पूर्ण पणे जळून खाक झाली. अग्निशामक दलाने पाण्याच्या फवाऱ्याने आग विझविली सदर घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
कार मालक सतीश प्रभाकर पोपटटीवार यांनी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन गाठून घटनेची तक्रार नोंदविली सदर तक्रारीची दखल घेत मौका चौकशी करण्यात आली पुढील तपास पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली API खेडीकर करीत आहेत.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular