Sunday, May 29, 2022
Homeचंद्रपुरदेशी दारू दुकानाला वॉर्डातील महिलांचा विरोध

देशी दारू दुकानाला वॉर्डातील महिलांचा विरोध

न. प. ने दिले आहे ना हरकत प्रमाणपत्र

नगरसेविका सौ.वैशाली सु. गोरे नगरपरिषदे पुढे केले उपोषण

गडचांदूर नगर परिषद गडचांदूर येथील नगरसेविका वैशाली सू. गोरे व समस्त डी लेआउट मधील नागरिकांनी लांजेकर यांच्या देशी दारू दुकानाला गडचांदूर येथील त्यांच्या वॉर्डात न. प. ने दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्राचा विरोध करत काल दिनांक २५ ऑगस्ट २०२१ रोजी नगरपरिषद गडचांदूर समोर संविधानिक मार्गाने उपोषण आंदोलन करत मा. मुख्याधिकारी साहेब न. प. गडचांदुर यांना निवेदन देण्यात आले.

गडचांदूर नगर परिषदेने दि.२०.०७.२०२१ रोजी विशेष समेत बेकायदेशीरपणे श्री. बी. लांजेवार यांच्या CLIII अनुज्ञप्ती दारूचे दुकान ) गडचांदूर नगरपरिषदेच्या हत सर्वे नंबर ३६६/१ मालमत्ता कमांक ९८८ च्या इमारतीत स्थलांतरित करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबतचा ठराव दि. १७.०८.२०११ रोजीच्या शासन निर्णयाचे उल्लंघन करीत प्रभागातील नागरिकांची सहमती न घेता केला आहे. सदरचे देशी दारू दुकान सुरू करण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. या अनुसगाने प्रभागामधील रहीवासी व नगर सेविकानी नगर परिषद समोर धरने आंदोलन व एक दिवसिय लाक्ष्यणिक उपोषन प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरीता केले. या दारू भट्टीला त्यांच्या वॉर्डातून इतर कुठे ही हालवण्याची विनंती केली आहे. सदर निवेदन मुख्याधिकारी न. प. यांच्या मार्फत मा. उत्पादन शुल्क मंत्री महाराष्ट्र राज्य, मा. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर, मा. जिल्हा उत्पादन शुल्क चंद्रपूर, मा.तहसिलदार साहेब कोरपना, मा.नगराध्यक्ष नगर परीषद, गडचांदूर यांना देण्यात आले.

शहरात आधीच अपेक्षे पेक्षा जास्त दारूची दुकाने आहे. त्यावर नगरपरिषदेने तडकाफडकी विशेष सभा बोलावून इतर विकासात्मक विषयांसह पुन्हा दारू दुकांनचा ठराव घेतला होता. न.प.च्या नगराध्यक्षांनी २० जुलै रोजी “विशेष सभा समिती” ची सभा बोलावली होती. यासभेतील ५ पैकी चौथा विषय म्हणजे इतर ठिकाणची दारू दुकान गडचांदूर येथे स्थलांतरीत करणे हा होता. विरोधी पक्ष नगरसेवकांनी नेमका यालाच विरोध दर्शविला होता.
दारू दुकानाला आमचा विरोध नसून फक्त हे दुकान आमच्या ले-आऊट मध्ये नको, इतर कुठल्याही ठिकाणी हलवा.
महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ कलम ८(२) नुसार १/४(एक चतुर्थांश) सदस्यांनी विशेष सभा लावण्याबाबत विनंती अर्ज केल्यास नगराध्यक्षांना सभा लावता येते. परंतू याठिकाणी असे कोणत्याही सदस्यांचे अर्ज नसताना स्वतःच्या अधिकाराने सभा लावून त्यात एकूण ५ विषय ठेवले त्यातील विषय क्रं.४ हा स्थलांतरित दारू दुकानाचा होता. ही सभा केवळ आणि केवळ दारू दुकानाला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठीच लावल्याचा खळबळजनक आरोप विरोधी नगरसेवकांकडून होत आहे. विरोधकांच्या लेखी व तोंडी आक्षेपाला तसेच त्या प्रभागातील महिलांच्या आक्षेपाला बगल देत सत्ताधाऱ्यांनी सदर ठराव एकमताने मंजूर केला. त्यावेळी भाजप व शिवसेना नगरसेवकांनी याचा कडाडून विरोध केला होता.शिवसेना गटनेता सागर ठाकुरवार, सरवर भाई, सौ.रजी़या शेख खाजा हे तीन नगरसेवक अनुपस्थीत होते तर अरविंद डोहे, रामसेवक मोरे दोन्ही नगरसेवक भाजप, सौ.गोरे, सौ.कोडापे व सौ.अहीरकर हे शिवसेनेच्या नगरसेविका यावेळी सभेत उपस्थीत होत्या. आता त्या ले-आऊटच्या नागरिकांची मागणी पुर्ण होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“आमचा विरोध या देशी दारू दुकानाला यासाठी आहे.कारण की समोर शाळा व वाचनालय आहे, समोर आश्रमशाळेचे काम सुरू आहे,त्यमध्ये सौंदर्यकरण आहे, ग्रीन जिम आहे. दारू दुकानामुळे याठिकाणी दारूड्यांचा बाजार राहणार असल्याची शक्यता नाकारता येत नसून आम्हाला दारू दुकानाचा विरोध नाही.परराज्यातील अनेक लोक येथे दारूचे धंदे करीत आहे तर आपल्या मराठी लोकांनी केले तर यात गैर काय ?? न. प. ने हे दारू दुकान इतरत्र हलवायला पाहीजे एवढीच आमची मागणी आहे. यानंतर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू आणि तिथले जे दारूचे दुकान आहे त्याला आम्ही हाणून पाडू. जर हे मानत नसेल तर महिलांना सोबत घेऊन तिथे तोडफोड करू.”
सागर ठाकूरवार
शिवसेना तालुका प्रमुख व गटनेता नगरसेवक

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular