एक जागरूक नागरिक बनून शिवजयंती साजरी केल्याबद्दल आपले खूप खूप आभार.

शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पटेल हायस्कूल चौकातील प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
मोहम्मद कादर शेख यांनी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज यांनी जाती-पाती वा धर्माच्या आधारांवर भेदाभेद न करता सर्वांना सोबत घेऊन धर्मनिरपेक्ष आणि प्रजाहितदक्ष स्वराज्य निर्मिती करणारे जाणता राजा होते, जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या युवा पिढीने अंगीकृत करण्याची वेळ आहे .सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!