Monday, June 27, 2022
Homeचंद्रपुरदारू बंदि उठण्यापूर्वीच भद्रावती शहरात दारू विक्रीला उधान

दारू बंदि उठण्यापूर्वीच भद्रावती शहरात दारू विक्रीला उधान

अवैध धंद्यात व दारू विक्रीत वाईट काॅलर सक्रिय
भद्रावती, दि 12 (विशेष प्रतिनिधि)


चंद्रपुर जिल्हातील दारु बंदि उठवावी कि नाही या विचारात सरकार असतांनाच अनेक दारू विक्रते व बार मालक यांना दारू बंदि उठण्याचे वेध लागले असुन त्या पैकि काहि जनांनी खुले आम दारू विक्री सुरू केली आहे.


दारू बंदि हठविली जाणार या अपेक्षेने पोलिस विभागानेहि ढिली दोरी सोडल्याने अवैध दारू विक्रते फारमात आले असुन त्यांनी हाॅटेल, चहा टपर्या यांचा आढून बिनधास्त दारू विक्री सुरू केली आहे. या दारू विक्रीला मुक संमती असल्याने अवैध दारू विक्रीते बेडर झाले आहेत. या दारू विक्री मध्ये अनेक बाल गुन्हेगार युवक व महिला सुध्दा सक्रिय झाल्या आहेत. पोलिस प्रशासनाचा अजिबात वचक न राहिल्या मुळे स्टंट बाजी शो करण्याला ऊत आला आहे. तर गांजा विक्रीला मोठ्या प्रमाणात उत आला आहे. शहरातील पिंडोनी स्मशान भुमी, मल्हार तलाव स्मशान भुमी, कर्नाटक एम्टाचे जंगल, गवराळा तलाव गार्डन, तेलवासा रोड आय टि आय जवळ देवुळ कंट्रक्शन चा मागचा खुला परीसर ईत्यादि ठिकनी राञीचा वेळेला, गांजा ची नशा युवकान कळून केली जाते. यात शाळकरी मुले, मुली सहभागी होत आहेत. या मुला मुलींना कुठून गांजा कुठून गांजा मिळतो याचा शोध पोलिस प्रशासन घेईल का? असा सवाल भद्रावती शहरातील सुध्न नागरीक विचारत आहेत. सध्या रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे. किमान या सप्ताहात तरी अपघात व्हायला नाही पाहिजे. तरी देखील दि.11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता एका चारचाकी वाहणाने धडक देऊन तिन नागरिकांना जखमी केले. त्यामुळे या सप्ताहाला गालबोट लागले. भद्रावती शहरात काही ठिकाणी सी.सी.टिवी कॅमेरे लावले आहे.परंतु ते शोभेची वस्तू ठरले आहेत. रेती तस्करीहि मोठ्या प्रमाणात चालू आहे. कोरोना काळात पोलिसांचा धाक असल्यामुळे तंबाखु व खर्रे विक्रेत्यांना आळा बसला होता. परंतु आता माञ पोलिस प्रशासन सुस्त बसल्याने तंबाखु व खर्रे विक्रेत्यांनी डोके वर काढले आहेत. भद्रावती शहरातील अशा अवैध धंद्या बद्दल अनेक राजकिय पक्ष व संघटनांनी गृह मंञी अनिल देशमुख भद्रावती आले असता त्यांना निवेदन देण्यात आले. माञ त्याचा काही फायदा झाला नाही. उलट अवैध धंदे व दारू विक्री जोमाने चालु झाल्याचे चिञ दिसत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular