Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरत्या व्हायलर वीडियोने पाटण उप पोलीस स्टेशन बनले" टिक टॉक हिट.

त्या व्हायलर वीडियोने पाटण उप पोलीस स्टेशन बनले” टिक टॉक हिट.

  • आरटीपीसीआर कोविड चाचणी करायला आलेल्या आरोग कर्मचाऱ्यांना केले चित्रीकरण.
  • सोशल मीडियावर चित्रीकरणझाले व्हायरल.
  • पोलीस स्टेशन आवारातील चित्रीकरण अशोभानीय.

डचांदुर .मो.रफिक शेख-

सोशल मीडियाचे वेड इतके वाढलेलं आहे की आपण कुठे काय करतोय याचे साधे भानही उरलेले नाही. सध्या जीवती तालुक्यातील पाटण उप पोलीस स्टेशनच्या परिसरातील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तर दुसरी कडे चित्रीकरण करताना आम्हाला काहीच माहिती नाही असे तेथील पीएसआय राजकुमार मडावी म्हणतात आश्चर्यच.


प्राप्त माहिती नुसार पाटण येथील उप पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचारी व तेथील विनाकारण रस्त्याने फिरणारे नागरिक,वाटसरू यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. जवळपास आठ ते पंधरा दिवसांपूर्वी हे शिबीर झाले. हेतू चांगला होता. पोलीस कर्मचारी व आरोग्य विभाग या कामात एकमेकांना सहकार्य करत होते. परंतु आरोग्य विभागाच्या एका महिला कर्मचार्याला चित्रीकरणाचा मोह आवरता आला नाही. तिने चक्क प्रशिक्षित चित्रीकरण असल्यासारखे पोलीस स्टेशनच्या अगदी समोर चित्रीकरण केले. याविषयी पोलिसांना कोणत्याही प्रकारची पूर्वसुचना किंवा पूर्व परवानगी सुद्धा घेतली नाही. आणि हे चित्रीकरण सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिस स्टेशनच्या आवारात चित्रीकरण कारण्याला तसही बंदी असते. आणि पाटण पोलीस स्टेशन तर अति संवेदनशील आहे. तरीही कुठलीही पर्वा न करता या महाभगीरतांनी चित्रीकरण केले व सोशल मीडियावरही टाकले. हे सर्व सुरु असतांना एकाही पोलीस कर्मचार्याने त्यांना अडवले किंवा हटकले नाही याचेही आश्चर्य वाटत आहे.
पाटण उप पोलीस स्टेशनं चे पीएसआय राजकुमार मडावी यांच्याशी संपर्क साधला असता घडलेला प्रकार हा खरा असून त्यासंदर्भात चित्रीकरण करणाऱ्याला तोंडी सुचना दिल्या आहेत व यापुढे पोलीस स्टेशनच्या आवारात आरोग्य तपासनी शिबीर लावू देणार नाही अशी प्रतिक्रिया बोलताना दिली. परंतु अश्या प्रकारच्या चित्रीकरणने पोलीस प्रशासन आणि आरोग्यविभागाची प्रतिमा मलिनी झाली आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी जेवढे दोषी आहे तेव्हडेच पोलीस प्रशासनाची उदाशिनता व दुर्लक्षितपणा ही जबाबदार आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular