Sunday, May 29, 2022
Homeचंद्रपुरत्या दोघाही प्रेमीयुगलांचा अखेर! शुभविवाह

त्या दोघाही प्रेमीयुगलांचा अखेर! शुभविवाह

विनोद दोनाडकर
विदर्भ कल्याण
ब्रह्मपुरी:
बेधुंद हाताने सप्तरंगाची आकाशात केलेली उधळण म्हणजे प्रेम! खडखड वाहत येणाऱ्या नद्यांना खुल्या दिलाने समुद्राने आपल्या कुशीत सामावून घ्यावं तसं प्रेम तहानेने व्याकूळ झालेल्या जमिनीवर श्रावणसरीनीं बेधुंदपणे बरसावं आणि धरतीला हिरवी गार करून सोडणं आयुष्याच्या वेलीवर सतत हास्य फुलत रहाणं म्हणजे प्रेम!
प्रेमाला उपमा नाही हे तर देवाघरचे देणे असे म्हणतात ते अगदी खर आहे जीवनात कितीतरी युवक-युवतींच्या जीवनात असे प्रसंग येतात.


असाच प्रसंग घडलाय ब्रह्मपुरी तालुक्यातील बरडकिन्ही येथील मनीष पिलारे व देसाईगंज तालुक्यातील ऊसेगाव येथील अस्मिता अवसरे यांच्या बाबतीत
अनेक दिवसांपासून या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते मनीच्या कुटुंबाकडून कोणताही विरोध नव्हता परंतु बरेच दिवसापासून अस्मिताच्या आई वडीला कडून लग्नाला विरोध होत असल्यामुळे मनीष आणि अस्मिता अगोदर पळून जाऊन लग्न करण्याचा विचार केला मात्र नंतर एकमेकांना समजून घेत दोघांनाही बरडकिन्ही येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच भास्कर गोटेफोडे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष होमदेव ठाकरे यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला त्यांनी मनीष आणि अस्मिताची विचारपूस केल्यानंतर गावातील नागरिकांच्या सहकार्यातून दिनांक 24 ऑगस्ट रोजी सुधाकर पिलारे यांचे घरी हा शुभविवाह मोजक्‍याच पाहुणे मंडळी व गावकऱ्यांच्या सहकार्याने संपन्न झाला यावेळी ग्रामपंचायतचे उपसरपंच भास्कर गोटेफोडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष होमदेव ठाकरे किन्ही गावचे माजी सरपंच पुंडलिक प्रधान चौगान येथील काँग्रेस कार्यकर्ते भगवान प्रधान बरडकिन्ही येथील माजी उपसरपंच तानाजी दानी रुई येथील सुरेश बुल्ले यांच्यासह गावातील नागरीक व आप्तेष्ट मोजकीच पाहुणे मंडळी उपस्थित होते

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular