Wednesday, June 7, 2023
Homeचंद्रपुरत्या आदीवासी महीलेला मारहान व छेडछाड करणाऱ्या आरोपीवर एट्रासिटी दाखल करा.

त्या आदीवासी महीलेला मारहान व छेडछाड करणाऱ्या आरोपीवर एट्रासिटी दाखल करा.

आबीद अली गडचांदुर.मो.रफिक शेख.

तालुक्यातील सोंडो येथील सुनिता राजेंद्र मेश्राम या आदिवासी महिलेला शरीरसुखाची मागणी करून भर चौकात त्यांच्या चारित्र्याचे व बदनामीकारक कृत्य करीत घरात जाऊन बेदम मारहाण करणाऱ्या सत्यपाल उडतुलवार तो त्याच्या नातेवाईकांनी संगणमत करून बेशुद्ध पडेपर्यंत मारहान करणारी घटना अतिशय नींदनीय आहे. पोलिसांनी आरोपीवर केलेला गुन्हा दाखल म्हणजे दुखण्यावर फुंकर घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबीद अली यांनी केला आहे. काल जिल्हा रुग्णालयात जाऊन सुनिता मेश्राम यांची भेट घेऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य यांच्यावर झालेला अन्याय अत्याचार, छेडछाड, शरीरसुखाची मागणी, दगडाने ठेचून मारपीट, असे गंभीर प्रकार समाजात एका महिलेची केलेली बदनामीचे कृत्य झाले असताना भा.द.वि.च्या कलम 324,504,506,34 नुसार केलेली कारवाई ही घटनेच्या विपरीत असून घडलेल्या घटनेनुसार आरोपीवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध व विनयभंगाचा प्रकार घडल्याने गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. अलीकडे या क्षेत्रात जमीन हडप ने अधिवासावर अन्याय अत्याचार करणे असे प्रकार वाढत असल्याने जिवती, कोरपना, राजुरा या भागात वाढ होत असल्याचे निवेदनात नमूद करून आदिवासीवरील अन्यायाची गंभीरतेने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. तसेच या प्रकरणाचा छडा लावण्याकरिता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बेबीताई उईके यांचे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षकांना भेट घेऊन निवेदन देणार असाल्याची माहिती आबीद अली यांनी दिली आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular