दारू प्या एक अंडा किंवा चिकन पिस फ्री मिळवा
विशेष प्रतिनिधी:- भद्रावतीत ठानेदाराचा मैञीने अवैध धंदे जोमात सुर असुन दारू विक्रेत्यांन मध्ये स्पर्धा सुरूआहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी दारू विक्रेते वेगवेगळ्या शक्कली लढवत आहे.

भद्रावती शहरातील काही अवैध दारू विक्रत्यांनी विकण्यासाठी एक अंडा व एक चिकनचा पिस फ्रि देण्याची स्किम चालु केली आहे.
काही हाॅटेल व्यवसाईक बाहेरच फ्राय केलेल्या मच्छा लटकवुन ठेवतात. व या व्यवसाया आढुन सर्रास दारू विक्री करतात. त्यामुळे चांगल्या हाॅटेल व्यावसाईकांना पोलिसांकडून ञास सहन करावा लागतो. ज्या ठिकाणी दारू चे अड्डे असतात. त्या ठिकानकडे पोलिस जानिव पुर्वक दुर्लक्ष करतात. एक एप्रिल पासुन दारू बंदि हटन्याचा चर्चेने अवैध दारू विक्रेत्यांन मध्ये निराशेचे वातावरण पसरले असुन दारू बंदि होण्यापुर्वीच चांगली कमाई करून घ्यावी या विचाराने स्पर्धा करायला लागले आहे.
तर दुसरीकडे दारू बंदि उठणार म्हणून दारू पिणार्यान मध्ये आनंदाची लाट निर्माण झाली आहे. दारूबंदी हटल्यास दारू चा दुकानातुन किंवा बार मधुन स्वस्त किंमतीत दारू मिळणार म्हणून ते आनंदात आहेत. याचाच गैर फायदा घेवुन अनेक ठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांन कडून हप्ते वसुलीचे काम पोलिस विभागाचे गुन्हे शाखेचा एक शिपाई जोमाने करित आहे.