Monday, June 27, 2022
Homeचंद्रपुरज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चौगान येथे आरोग्य शिबीर कोविड-19 मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चौगान येथे आरोग्य शिबीर कोविड-19 मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न


70 विदयार्थी व कर्मचाऱ्यांनी घेतला शिबिराचा लाभ

अर्हेरनवरगाव:- ब्रम्हपूरी तालुक्यातील चौगान येथे ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय तथा स्व राजीव गांधी कृषि तंत्रनिकेतन चौगान यांच्या संयुक्त विद्यमाने चौगान येथे आरोग्य शिबीर व कोविड-19 च्या सर्दभात मार्गदर्शन कार्यक्रम आयोजन करण्यात आले. या शिबीराचे मुख्य मार्गदर्शक डाॅ. प्रशांत चौधरी प्राथमिक आरोग्य केंद्र चौगान तर प्रमुख अतिथी उमेशजी धोटे सरपंच ग्राम पंचायत चौगान, प्रा. अंकुश जी मातेरे उपसपंच ग्राम पंचायत चौगान, व ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चौगान चे अध्यक्ष रुपेश निहाटे सर, स्व. राजीव गांधी कृषी तंत्र निकेतन चौगान च्या प्राचार्य हाश्मी मॅडम, कृपाकर चहांदे विडीओ वाॅलर्टिअर्स उपस्थित होते.


आरोग्य शिबीर मध्ये BP, HB, थाइरॉइड, वजन, करून जवळपास 70 विद्यार्थी व कर्मचारी यांची तपासणी केली व कोविड-19 सर्दभात स्वतः कशी काळजी घेणे यासंदर्भात डॉ. प्रशांत चौधरी यांनी मार्गदर्शन केले. तर उमेश जी धोटे सरपंच व अंकुश मातेरे उपसपंच यांनी सुध्दा कोविड-19 च्या संदर्भात सुरक्षिता किती महत्वाचे आहे, यावर प्रकाश टाकला. ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चौगान यानी या आरोग्य शिबीराचे आयोजन केले त्यबद्दल ग्रामस्थांनी यांचे आभार मानले.
या आरोग्य शिबीराचे आयोजन व यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चौगान ची संर्पुण टिम व ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चे सर्व कर्मचारी प्रार्चाय लालाजी मैद सर, सोनाली मैद मॅडम, यांनी मोलाचे सहर्काय केले तर कार्यक्रमाचे संचालन अशोक तोंडरे सर यानी केले व आभार प्रदर्शन प्रधान मॅडम यानी मानले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular