Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरजि.प.शाळा श्रमदानातून बहरली

जि.प.शाळा श्रमदानातून बहरली


(प्रशांत राऊत)
अर्हेरनवरगाव :-ब्रम्हपुरी तालुक्यातील सोन्द्री गावातील जि. प. शाळा मनमोहक फुलांनी व परसबागेने बहरली असून शाळेच्या उभ्या असलेल्या भव्य व सुसज्य इमारती आणि उत्तमरीत्या संरचित केलेला बगीचा त्याचप्रमाणे परसबाग लक्ष वेधणारा व मनाला भुरळ घालणारा आहे.शाळेजवळून ये-जा करणारा प्रत्येक व्यक्ती शाळेचे सौंदर्य क्षणभर न्याहाळल्यावाचून पुढे जाऊ शकत नाही, असे देखणे व मनमोहक दृश्य निर्माण झाले आहे.


जि. प. केंद्र शाळा सोन्द्री येथील मा. मुख्याध्यापक श्री. दुपारे सर यांच्या मार्गदर्शनातून, संकल्पनेतून आणि सर्व सहकारी शिक्षकांच्या मदतीने त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रेरणेतून मनमोहन बगीचा व परसबागेची निर्मिती झाली आहे. बगिच्या मध्ये विविध प्रकारचे सुगंधित फुलझाडे व मनाला भुरळ घालणारे झाडे आणि परसबागेत मेथी, मुळे, पालक, वांगे, मिरची, टमाटर, कोथिंबीर, गाजर, चवळी, वाल यासारख्या फळे भाज्या व पालेभाज्यांची लागवड केली आहे.
या सुप्त उपक्रमातून विद्यार्थ्यामध्ये श्रमप्रतिष्ठा, संघ प्रवृत्ती, वेळेचा सदुपयोग, नवनिर्मिती, कार्य-कौशल्य, आत्मविश्वास, पर्यावरण संवर्धन यासारखे शैक्षणिक उद्दिष्टे व गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे कार्य शाळेचे मुख्याध्यापक श्री. दुपारे सर यांच्या मार्गदर्शनात श्री. लोनबले सर, श्री. राऊत सर, राऊत मॅडम , नार्लावार मॅडम , अलोणे मॅडम यांच्याकडून होत आहे. या सर्व उपक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री यादवजी तुपट व सर्व सदस्य प्रेरणा व प्रोत्साहन देऊन शिक्षकांचे मनोबल उंचावण्याचे कार्य करीत आहे. या मनाला भुरळ घालणाऱ्या शाळेच्या सौंदर्याकडे पाहून सर्वत्र शाळेचे कौतुक होत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular