चंद़पूर:—-
येथिल ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा चंद्रपूर शाखेच्यावतीने ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रामुख्याने अध्यक्ष म्हणून विदर्भ प्रांत सचिव लीलाधर लोरे तर प्रमुख अतिथी म्हणून एडवोकेट राजेश विरानी जिल्हाध्यक्ष परशुराम तुंडूलवार उपस्थित होते.

या निमित्ताचे ग्राहकपंचायत चंद्रपुर चे सचिव-आनंद के मेहरकुरे यांच्या पुढाकाराने व अध्यक्ष श्री परशुराम तुंङुलवार यांच्या साहाय्याने तालुका बल्लारपुर जि.चंद्रपुर ची ग्राहकपंचायत ची कार्यकारणी घोषीत करण्यात आली त्यात अध्यक्ष प्राध्यापक सो सुचिता खनके ऊपाध्याय – गव्हारे सचिव अँङोकेट सोनाली खनके यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी ग्राहकन्याय या मासिका पुस्तकेचे विमोचन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. किशोर बांते , डाँ स्वपनकुमार दास व सौ छबुताई वैरागङे यांनी अनेक विषय अनुशगाने मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष ग्राहक पंचायत चंद्रपूर वेदांत मेहरकुळे यांनी प्रास्ताविक परशुराम जी तुंडूलवार तर आभार जिल्हा संघटक जनार्धन धगङी यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता जिल्हा संघटिका सारिका बोराङे, कांचन माकोङे, वसुधा बोडखे, मनोहर शेन्ङे , दिलीप गड्डमवार ,किशोर बान्ते सिंह साहेब यांनी परिश्रम घेतले.