Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरजप्त केलेली अवैध दारू वर्षभर एस.टी. महामंडळाच्या ताब्यात -

जप्त केलेली अवैध दारू वर्षभर एस.टी. महामंडळाच्या ताब्यात –

अनेक प्रकरणाची पोलिसात तक्रार सुद्धा नाही

नियमबाह्य पद्धतीने दारू स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे कारण गुलदस्त्यात
जप्त दारू पोलीस किंवा अबकारी विभागाच्या ताब्यात नवर्षभरानंतर देण्याचे कारण काय?

जप्त केलेल्या दारूचे पुढे काय होते ह्याचे उत्तर कोण देणार?

अवैध दारू वाहतुक करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचा सर्रास वापर होत असतो त्याचप्रमाणे महामंडळाचे कर्मचारीही दारू तस्करी करीत असल्याचे वेळोवेळी जप्त केल्या जात असलेल्या दारूसाठ्यावरून सिद्ध होत असते.

आकस्मिक तपासणीत बरेचदा कर्मचारी परजिल्ह्यातून व परराज्यातून विक्रीसाठी अवैधपणे दारूची वाहतुक करित असताना रंगेहात पकडल्या गेले आहेत. वास्तविक बघता दारू तस्करीत गुंतलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांची पोलिसात तक्रार द्यायला हवी मात्र बरेचदा असे होत नाही ह्यामागे काय गौडबंगाल आहे हे सर्वश्रुत आहे.

मागील भागात आपण वाचलेच आहे की, एकाच दिवशी, एकाच मार्गावर झालेल्या तपासणीत दारू तस्करी करताना आढळलेल्या दोन पैकी एका चालकाची पोलिसात तक्रार करण्यात आली तर दुसर्‍याची तक्रार करण्यात आली नाही. बरे अशा प्रकरणात हस्तगत करण्यात आलेली दारू कुठे ठेवली जाते? ह्या दारूचे पुढे काय केले जाते हे अजुनही गुलदस्त्यात आहे. ह्याबाबतीत काही विचारणा केली असता विभागीय वाहतुक अधीक्षक एकतर आपली जबाबदारी झटकतात किंवा गोपनीय प्रकरण असल्याची बतावणी करून माहिती देण्यास नकार देतात. ह्यावरून असे प्रकरण दडपल्या जात असल्याचे दिसत आहे.

वास्तविक बघता जप्त केलेली दारू सील करून पोलीस अथवा अबकारी विभागाच्या मालखाण्यात जमा करायला हवा व चौकशी करताना किंवा प्रकरणाची सुनावणी करताना तो मुद्देमाल चौकशी अधिकारी अथवा चौकशी समितीच्या अवलोकनासाठी आणायला हवी मात्र असे केल्या जात नसून ती दारू अवैधपणे महामंडळाच्या कस्टडी मधे ठेवण्यात येते.

काही काळापूर्वी अशाच एका प्रकरणात चौकशी करताना विभागीय वाहतुक अधीक्षक च्या टेबलवर चक्क दारूच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. आणि महत्वाचे म्हणजे जप्त केल्यापासून ही दारू पोलिसांच्या किंवा अबकारी विभागाच्या कस्टडी मधे ठेवण्यात आली नाही तर ती चक्क महामंडळाच्या ताब्यात अवैधपणे ठेवली होती.

ह्या शिवाय इतर प्रकरणात सुद्धा हीच कार्यप्रणाली अवलंबण्यात येत असुन ही कोणत्या नियमानुसार तसेच कोणत्या कायद्यानुसार करण्यात आले ह्याचे कुठलेही उत्तर विभागीय वाहतुक अधीक्षक देण्यास तयार नाही. त्याचप्रमाणे सुनावणी झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई करण्यात आली किंवा कारवाई झाली नसल्यास त्याचे कारण देखिल विभागीय वाहतुक अधीक्षक देण्यास तयार नसतात.

प्रत्येक प्रकरणात माहिती दडवून ठेवण्यात ह्या अधिकाऱ्यांचा काय उद्देश अथवा स्वार्थ आहे हे कळण्यास मार्ग नाही. तसेच कर्मचाऱ्यांशी अरेरावी पद्धतीने व एकेरी बोलणार्‍या तसेच वारंवार कायद्याचे उल्लंघन करणार्‍या ह्या अधिकाऱ्यांवर राज्य परिवहन महामंडळ काय कारवाई करते हे बघणे रंजक ठरणार आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular