Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरचिमूर वरोरा नॅशनल हायवे रोड च्या कामाला आली गती …

चिमूर वरोरा नॅशनल हायवे रोड च्या कामाला आली गती …

रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण होणार ….

शेगांव –

चिमूर वरोरा नॅशनल हायवे रोड चे काम सदर एस आर के कांत्रक्षण कंपनी कडे असून गेल्या अनेक दिवसांपासून हे काम संत गतीने सुरू असल्याने या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देऊन प्रवास करावा लागत होता..


त्यामुळे या रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे या करिता दैनिक वृत्त पत्रात अनेकदा बातम्या प्रकाशित करण्यात आल्या व संबंधित विभाग तसेच शासन प्रशासनाचे डोळे उघडण्याचे प्रयत्न करण्यात आले .
अखेर या बातम्यांचा प्रकाश संबंधित विभाग तसेच शासन प्रशासन चे डोळे उघडले नाही पण मात्र स्थानिक राजकीय प्रहार जन शक्ती पक्ष चे डोळे उघडले व आंदोलन पुकारून रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागले तेव्हा अश्या अनेक गंभीर समस्या ची विशेष दखल घेऊन सदर एस आर के कांट्रक्षण कंपनीने चे मुख्य अधिकारी श्री प्रसाद यांनी या रस्त्याच्या कामाला अधिक गतिमान करून रस्त्याचे काम तात्काळ करण्यात येईल अशी ग्वाही देत त्यांनी आपल्या कार्याची पावती जनते समोर दाखवले .
तेव्हां या वरोरा चिमूर नॅशनल हायवे रोड चे काम तात्काळ पूर्ण होणार असल्याने प्रवास्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पाहायला मिळत आहे .

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular