Saturday, June 25, 2022
Homeचंद्रपुरचांदा मोटर्स मधून चारचाकी वाहन चोरणाऱ्याला 24 तासात अटक !

चांदा मोटर्स मधून चारचाकी वाहन चोरणाऱ्याला 24 तासात अटक !

चंद्रपूर :- चंद्रपूर-नागपूर मार्गावरील चांदा मोटर्स या दुचाकी व चारचाकी वाहन विक्री कार्यालयातील पार्किंग मधून 18 जुलै रोजी इर्टीगा चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. ०४. एफ. झे. ५२९० किंमत 3 लाख 50 हजार हे अज्ञात इसमाने चोरी केली होती.


चांदा मोटर्स चे आरिफ खान मकसूद खान पठाण यांनी याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार केली, गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता गुन्हे शोध पथकाचे सपोनि अब्दुल मलिक यांनी तपासाची चक्रे फिरवीत 24 तासाच्या आत गुन्ह्याचा छडा लावला.
या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांचे जवळून चोरी गेलेलं चारचाकी वाहन, दुचाकी वाहन व 2 मोबाईल असा एकूण 4 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींमध्ये रोहीत सिध्दार्थ जाभुळकर, वय-२९ वर्ष रा. जुनोना चौक, साईनगर यादव किराण स्टोअ जवळ, बाबुपेठ वार्ड, चंद्रपुर, अंकित प्रदिप नागापुरे, वय २१ वर्ष रा. सावरकरनगर, दुध डेरी, चंद्रपुर यांना अटक करण्यात आली आहे.
अशी झाली कार चोरीची प्लॅनिंग 18 जुलै रोजी आरोपी रोहित व अंकित हे चांदा मोटर्स च्या कार्यालयात जात आम्हाला कार खरेदी करायची आहे असे सांगत त्यांनी वाहन बघायला सुरुवात केली, कार बघितल्यावर आमचे वडील येणार असे सांगत दिवसभर ते चांदा मोटर्सच्या कार्यालयात होते, वेळ बघून त्यांनी चारचाकी वाहनांची चाबी मिळवली व तिथून निघून गेले.
रात्र झाल्यावर एक आरोपी हा दुचाकी वाहनाने त्या ठिकाणी आला व नागरिकांवर पाळत ठेवून होता, वेळेचा फायदा घेत दुसऱ्या आरोपीने पार्किंग मध्ये जात चारचाकी वाहन चोरी केले, विशेष म्हणजे वाहन चोरी करताना दुचाकी वाहनाने पायलटिंग करीत होता.
मोठ्या शिताफीने वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला रामनगर पोलिसांनी 24 तासांच्या आत कोठडीचा मार्ग दाखविला.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अरविंद साळवे चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, उपविभागिय पोलीस अधिकारी नांदेडकर यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोनि प्रदिपकुमार शेवाळे, सा, सपोनि मलीक, सपोनि अकरे, पो.हवा. रजनीकांत पुठ्ठावार, पोहवा/ प्रशांत शेंदरे, नापोशि/ पुरूषोत्तम चिकाटे, ना.पो.शी. संजय चौधरी, नापोशि/ ११७६ किशारे वैरागडे, नापोशि/ ०९ पेतरस सिडाम, नापोशि/ २२२९ विनोद, नापोशि/ २५८० पांडुरंग, नापोशि / ९१७ मुळे, नापोशि. / ५३२ सतिष अवथरे, पो. शी. /२४३० लालु यादव, पोशि/ २५१३ विकास, पोशि/ ८८१ संदिप पोशि/ ८२५ हिरालाल, पोशि/ १९३८ माजीद, मनापोशि/ २३२४ भावना रामटेके यांनी केली आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular