Monday, June 27, 2022
Homeचंद्रपुरचक कवडसी रिठ येथील भुमापण क्रमांक १८ व ३/२,चे व जांभूळघाट येथील...

चक कवडसी रिठ येथील भुमापण क्रमांक १८ व ३/२,चे व जांभूळघाट येथील भुमापण क्रमांक ३२ चे,चिमूर तहसिलदार यांना निमंत्रण,या आणि मूरुम उत्खनंनाची जागा मोजा,सत्य कळेल!

— शंकरपूर-चिमूर हायवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांकडून व इतरांकडून मूरुमाचे भरमसाठ उत्खनंन!

  प्रदीप रामटेके

जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

   चिमूर तहसीलदार संजय नागटिळक यांना अवैध उत्खननातंर्गत मूरुमांसी काही लेनेदेणे नाही,याच आविर्भावात ते आपली वर्तणूक करतांना दिसतात.मात्र चिमूर तालुक्यातील मौजा चक कवडसी रिठ येथील भुमापण क्रमांक १८ व ३/२ आणि मौजा जांभूळघाट येथील भुमापण क्रमांक ३२ यांनी चिमूर तहसीलदार संजय नागटिळक यांना खुले निमंत्रण दिले असून,तुमच्यात दम आहे तर मुरुम उत्खनंनाची जागा मोजा,सत्य काय ते बाहेर पडेल व सत्य काय ते तुम्हाला कळेल? असे अप्रत्यक्ष निमंत्रणाद्वारे तहसीलदार यांना सांगितले आहे.
       अवैध मूरुम उत्खननाची सत्य हकीकत लपवणारे तहसीलदार संजय नागटिळक हे आपल्या कर्तव्यातंर्गत संवेदनशील व कर्तव्यदक्ष नसल्याचे त्यांनीच स्पष्ट केले आहे.संजय नागटिळक यांच्या रुपात दुर्बल तहसीलदार चिमूर तालुक्याला लाभला,हे चिमूर तालुक्याचे दुर्दैव म्हणावे लागेल.
    तहसीलदार संजय नागटिळक यांना केवळ २ भुमिपण क्रमांकाणेच मूरुम उत्खनंनाची जागा मोजमाप करण्यासाठी अप्रत्यक्षपणे निमत्रण दिले आहे.बाकीचे मूरुम उत्खनंन भुमापण क्रमांक नंतर बोलावतीलच!मात्र,मुरुम उत्खनंन भुमापण क्रमांकाच्या अप्रत्यक्ष निमंत्रणाला अनुसरून तहसीलदार संजय नागटिळक हे भुमापण क्रमांकाच्या स्थळावर जावून मूरुम उत्खनंन जागा मोजमाप करण्यासाठी वेळेत तयार नसतील आणि ते कमालीचे गाफील असतील तर कायदा त्यांना या स्थळावर येण्यासाठी पुढे चालून मज्जाव करेल व कायदाच त्यांच्या मागे लागेल,एवढे निश्चित!
    शंकरपूर-चिमूर हायवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या त्रिकूट संचालकांना,जांभूळघाटाच्या लक्ष्मण भानुदास घाडगेंना,व इतर मूरुम उत्खनंन धारकांना वाचविण्याच्या प्रयत्नात तहसीलदार संजय नागटिळक हे बळीचे बकरे ठरणार नाही,याची खबरदारी ज्यांनी घेतली असेल,ते सुद्धा अवैध मूरुम उत्खननातंर्गत उघडे पडल्याशिवाय राहणार नाही,तूर्त एवढेच!
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular