कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे
चंद्रपूर जिल्हा तेलंगाना राज्य सीमेच्या दक्षिण भागातील जवळीक असलेला हा क्षेत्र आहे बल्लारपूर गडचांदूर सास्ती या परिसरामध्ये तेलंगणा राज्यातील अनेक कामगार कार्यरत आहे हैदराबाद हे राजधानीचे शहर व्यापार पेठा दृष्टीनेसुद्धा सोयीची असल्याने दळणवळण मालवाहू सुविधा सहज उपलब्ध होत असल्याने या भागातून चंद्रपूर वाया कोरपना आदिलाबाद हैदराबाद ही बस सेवा सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी आदिलाबाद येथील विभाग नियंत्रक यांना निवेदनाद्वारे केली आहे यामुळे वनी घाटंजी या भागातील प्रवाशांना सुद्धा सोयीचे ठरणार आहे.

या भागातील अनेक नाते-गोते तेलंगाना आंध्र प्रदेशराज्यातील असल्याने बस सेवा उपयुक्त ठरणार आहे आदिलाबाद येथील डीसी श्री राणू यांनी याबाबत सकारात्मक प्रयत्न करून आदिलाबाद डेपोमधून चंद्रपूर हैदराबाद बस सेवा सुरू करण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले यामुळे या भागातील प्रवाशांना व्यापाऱ्यांना चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे