Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरचंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी :- संदिप गड्डमवार

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी :- संदिप गड्डमवार

सावली/ व्याहाड खुर्द

सद्यस्थितीत शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट उभे आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सोसायटीच्या माध्यमातून आपला आर्थिक विकास साधावा त्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संदिप गड्डमवार यांनी केले ते व्याहाड खुर्द शाखे अंतर्गत आयोजित सोसायटी व शेतकरी बंधावाकरिता शेतीपूरक व मध्यम व दिर्घ सुधारित कर्ज धोरण अंतर्गत कार्यक्रमात बोलत होते.


शेतकरी सयंपूर्ण होण्यासाठी शेतीला शेतीपूरक जोडधंदे आवश्यक असून त्याकरिता राज्याचे मंत्री तथा चंद्रपूर जिल्याचे पालकमंत्री मान नाम विजयभाऊ वडेट्टीवार , बँकेचे अध्यक्ष मान संतोषजी रावत व संपूर्ण संचालक मंडळाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना तयार केले असून शेतकरी बांधवांनी सोसायटीच्या माध्यमातून याचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन यावेळी संदिप गड्डमवार यांनी केले यावेळी शेतकरी कल्याण योजने अंतर्गत धान पूजने जळालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे चेक वाटप करण्यात आले यावेळी बाजार समितीचे सभापती हिवराज शेरकी,रा का पा विधानसभा अध्यक्ष प्रशांत गाडेवार, सावली विका चे अध्यक्ष अनिल स्वामी, माजी बाजार समिती उपसभापती प्रविण उरकुडे, काँग्रेस नेते निखिल सुरमवार, शाखा व्यवस्थापक पुणेकर, निरीक्षक नरेड्डीवार, पवार तसेच विविध सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व गटसचिव प्रामुख्याने उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular