Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरघुग्गुस येथे रस्ता सुरक्षा अभियान

घुग्गुस येथे रस्ता सुरक्षा अभियान

घुग्घुस : पोलीस स्टेशनच्या वतीने 32 वा रस्ता सुरक्षा अभियान 2021 घुग्गुस परिसरात सहा.पो.नि. गोरक्षनाथ नागलोत यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला.

घुग्गुस बसस्थानक चौकात ऑटो, ट्रक व इतर वाहनास रिफ्लेक्टर स्टिकर सहा.पो. नि. मेघा गोखरे यांच्या हस्ते चिपकविण्यात आले व या 32 वा रस्ता सुरक्षा अभियान 2021 ची सुरवात करण्यात आली. हे अभियान दिनांक 18/1/2021 ते 17/2/2021 पर्यंत राबविण्यात येणार आहे.

“सडक सुरक्षा जीवन रक्षा” वाहन चालकास वाहन चालवीताना सीट बेल्ट वापरणे लेनची शिस्त पाळणे वळण्यापूर्वी इशारा देणे ओव्हरटेक उजव्या बाजूने करणे वेग मर्यादा पालन करणे मादक द्रव्य व मद्य सेवन करू नये व इतर सूचना चे अश्या आशयचे पत्रक वाटप वाहन चालकाना करण्यात आले या सूचनाचे पालन करण्याचे आव्हान पोलिसानच्या वतीने वाहन चालकाना करण्यात आले.

यावेळी सहा.पो.नि. मेघा गोखरे, गुन्हे पथकाचे सहा. फौजदार गौरीशंकर आमटे, वाहतूक शाखेचे विनोद लोखंडे, गजानन झाडे, गोंगले मेजर, सुधीर मत्ते,विकास चौधरी उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular