घुग्गुस येथे रविवार 14 फेब्रुवारीला सकाळी 11:30 वाजता घुग्गुस पद्मशाली समाजाच्या वतीने श्री महामृत्युंजय महर्षी मार्कंडेश्वर जयंतीचे औचित्य साधून घुग्गुस वणी मार्गावरील वेकोली मैदानाच्या समोरील नियोजित जागेवर श्री पद्मशाली समाज भवनाचे भूमिपूजन व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

सकाळी श्री मार्कंडेश्वर महर्षी यांची पूजा व आरती, मंदिराचे भूमिपूजन व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी घुग्गुस पद्मशाली समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास गुडला, उपाध्यक्ष शंकर कटकुरवार,सचिव राहुल पप्पुलवार, विनोद कोट्टलवार, सहसचिव चंद्रकांत चीप्पावार, राजू येंगलवार, कोषाध्यक्ष श्रीरामुलू मामीडला, राजू चीप्पावार महिला समितीच्या अध्यक्ष सौ.रविपूर्णा मंत्रिवार, उपाध्यक्ष विजया गुडला, सचिव सुषमा चीप्पावर, सहसचिव किरण कटकुरवार, पुष्पलता कटकुरवार, कोषाध्यक्ष रिता कोट्टलवार, सहकोषाध्यक्ष वंदना मुळेवार, सुमन गुंटुकवार सल्लागार समितीचे अनिल मंत्रीवार, गजानन बोंम्मावार, राजकुमार मुळेवार व समस्त समाज बांधव उपस्थित होते.