Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरग्रामपंचायत निवडणुकीचे ग्रामीण भागात वाहु लागले वारे" उमेदवारांची डोअर टु डोअर सुरु...

ग्रामपंचायत निवडणुकीचे ग्रामीण भागात वाहु लागले वारे
” उमेदवारांची डोअर टु डोअर सुरु झाली भेट”

सावली(ता.प्र)- सावली तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम घोषीत झाला , 31 डिसेंबर पर्यंत आवेदन फार्म भरण्याची तारीख होती , आजी,माजी सह नवख्या उमेदवारांनी फार्म भरुन निवडणुक रिंगणात उडी घेतली,तालुक्यात 50 ग्रामपंचायत आहेत ,आणि आता सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहु लागले आहेत,ग्रामीण भागातील लोक स्थानीक मतदान असल्याने निवडणुक चर्चा रंगु लागल्या आहेत .

तालुक्यात 31 ग्रामपंचायती कांग्रेस ,12 भाजपा तर 3 राका कडे होत्या ,परंतु आता आजी,माजी सह नवख्या तरुणांनी निवडणुक रिंगणात उडी घेतल्याने चर्चेला ऊत येत आहे
सावली तालुका हा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात येतो , या क्षेत्राचे आमदार तथा महाविकास आघाडितील घटक पक्ष कांग्रेस मधील विजय वड्डेटिवार हे जिल्हायाचे पालक मंत्री आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्या पक्षाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे ,जास्तीस जास्त ग्रामपंचायतीत आपल्या पक्षाकडेच असाव्या याकडे त्यांचे लक्ष तर प्रमुख विरोधी पक्ष भाजपा पण तयारीत आहे, भाजपाचे तालुक्यात जि.प.प.स. सदस्य आहेत तर सोबतच वंचीत बहुजन आघाडी आणि बसपा सुध्दा रिंगणात आहेत , आता जनता जर्नादन हा स्थानिक मतदार असल्याने तो कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतो हे येणारी वेळ ठरविणारच आहे
एकुणच सावली तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुक चर्चेला उधाण आले आहे हे मात्र विशेष…

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular