Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरगोंडपिपरी पेट्रोल दरवाढी विरोधात काँग्रेसचे धरणे

गोंडपिपरी पेट्रोल दरवाढी विरोधात काँग्रेसचे धरणे

गोंडपिपरी- तालुका प्रतिनिधी

संपूर्ण जगात कोरोणा महामारी ने तांदूळ घातले असताना देशात अनेक राज्यांमध्ये टाळेबंदी करण्यात आली. एकीकडे कोरोना तर दुसरीकडे बेरोजगारी ने होरपळलेल्या जनसामान्यांना शासनाकडून दिलासा मिळण्या ऐवजी महागाईच्या भस्मासुराने तोंड वर काढल्याने गोरगरीब जनतेला याचा फटका बसत आहे. अशा विदारक परिस्थिती पेट्रोल चे भाव शंभरी पार गेल्याने आज गोंडपिपरी येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल दर वाढी विरोधात काँग्रेसने धरणे आंदोलन केले.


याप्रसंगी प्रामुख्याने तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे ,कृऊबा सभापति सुरेश चौधरी, माजी सभापती राजीव सिंह चंदेल,शंभुजी येलेकर, देविदास सातपुते नामदेव सांगळे,शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, रामचंद्र कुरवटकर , युवक काँग्रेस अध्यक्ष संतोष बंडावार, सचिन फुलझेले,गौतम झाडे,वासु नगारे, महिला आघाडीच्या वनिता वाघाडे, इंदिरा नेवारे रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पेट्रोल दरवाढी सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी होत असल्याने केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular