बल्लारपुर पंचायत समितीचे उपसभापती सोमेश्वर पद्मगीरीवार यांनी केले नेतृत्व
तहसिलदारांना सादर केले निवेदन

चंद्रपूर : बल्लारपुर पंचायत समितीचे उपसभापती, भाजपा नेते सोमेश्वर पद्मगीरीवार यांनी सर्वसामान्य जनतेच्या, शेतक-यांच्या जिव्हाळयाच्या मागण्यांकरीता कोठारी ते बल्लारपुर तहसिल कार्यालयापर्यंत पायी चालत मोर्चा काढला व राज्य सरकारचा निषेध केला. सर्वसामान्य नागरिकांच्या, शेतकर-यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार बल्लारपुर यांना त्यांनी सादर केले.
शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमीत कर्ज फेड करणा-या थकीत नसलेल्या शेतक-यांना प्रोत्साहन म्हणुन ५० हजार रु. पर्यंत रक्कम देण्याचे शासनाने जाहीर केले होते परंतु ही प्रोत्साहनपर रक्कम अद्याप संबंधी शेतक-यांना दिलेली नाही. सदर रक्कम त्वरित देण्यात यावी, कोरोनाचे कारण सांगत शबरी आवास योजनो, रमाई आवास योजनेचे पैसे थकीत आहेत ही रक्कम त्वरित देण्यात यावी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई एकरी २५ हजार रु. देण्याची शासनाने जाहीर केले होते, ती रक्कम त्वरित देण्यात यावी, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना या योजनांच्या लाभार्थ्यांचे थकीत अनुदान त्वरित देण्यात यावे, भारनियमन त्वरित रद्द करुन शेतक-यांना दिलासा द्यावा आदी मागण्यांसाठी त्यांनी हा मोर्चा काढत तहसिल कार्यालयाला धडक दिली.
या मोर्चाचे नेतृत्व सोमेश्वर पद्मगीरीवार यांनी केले. सुनिल फरकडे, विनायक कोसरे, श्यामराव जुनघरे, रुपेश पोडे, श्यामसुंदर झाडे, राजु रेनकुंटलवार, योगेश पोतराजे, गणपत मोरे, किसन उरकुडे, कल्पना देशमुख, स्नेहल टिंबडीया, सरला परेकर, सविता नेवारे, दिवाकर कंबलवार, संगीता सिडाम, किशोर आत्राम, रुपेश विरुटकर, अशोक मोरे, रामदास पेंदोर आदी मोर्चात सहभागी झाले होते. बल्लारपुर शहरात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष हरीश शर्मा, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, शहर महासचिव मनिष पांडे, किशोर मोहुर्ले, सतिश कनकम, स्वामी रायबरम, विक्की दुपारे, मनिष पोशेट्टीवार, राजु दासरवार, हरिलंका, उदय तांड्रा, रोहीत गुप्ता, साई अरगीलवार, राजु आईलवार यांची उपस्थिती होती.