Saturday, June 25, 2022
Homeचंद्रपुरगडचांदूर मधील जनतेचा आक्रोश अडीअडचणी ऐकून घ्यायला नगर परिषदेमध्ये कोणीही नाही

गडचांदूर मधील जनतेचा आक्रोश अडीअडचणी ऐकून घ्यायला नगर परिषदेमध्ये कोणीही नाही

नगर अध्यक्ष फोन करून सांगतात घरी येऊन गेलेभेटा
गडचांदुर मो. रफिक शेख
गडचंदुर नगर परिषद अंतर्गत अनेक गोरगरीब जनतेला घरकुल आवास योजना वाटप करण्यात आलेले असून त्यातील निधी अनेक महिन्यापासून रखडून पडलेला आहे

रखडून पडलेल्या घरकुल आवास योजना निधीअभावी अनेकांची घरे अर्धवट राहिलेली आहे त्यांना पुढील घरकुलाची रक्कम कधी मिळणार???
या विचार विनिमय करण्यासाठी जेव्हा सर्वसामान्य जनता नगर परिषदेमध्ये गेली त्यावेळेस नगराध्यक्षांना फोन लावून सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झाले नाहीत , त्या ठिकाणी उपस्थित उपनगराध्यक्ष यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली यामुळे पुढील काळात आपला नगरसेवक कसा असावा जो जनतेला वेळ देणारा असावा या संबंधी विचार तेथील उपस्थित पीडितांनी केला

सदर घटनेकडे लक्ष देऊन तात्काळ घरकुल आवास योजनेचा जो निधी रखडलेला आहे तो पूर्ण करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू चौधरी व राजुरा विधानसभा अध्यक्ष महालिंग कंठाळे यांनी केलेली आहे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular