Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरखानगांव येथील इसमावर अस्वलाचा प्राणघातक हल्ला

खानगांव येथील इसमावर अस्वलाचा प्राणघातक हल्ला

चिमूर :तालुका प्रतिनिधी

चिमूर तालुक्यातील खानगाव येथील रहिवासी रामदास रामा चौखे वय ५५ वर्ष हे आपल्या स्वताच्या मालकीच्या शेतामध्ये हरभरा पिकांची राखण करण्याकरीता जागली जात असताना अचानक त्यांच्यावर अस्वलांने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे.

तालुक्यातील खानगाव येथील रामदास रामा चौखे हे नेहमी प्रमाणे रात्री ८.३०.ते ९ वाजता दरम्यान घरुन जेवण करून शेतांत जागलीसाठी जात होते तेव्हा अचानक त्यांच्या समोरून जंगलांच्या दिशेने येणाच्या अस्वलानी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला तेव्हा त्यांनी आरडा-ओरड केले असता त्याच्या शेताच्या सभोवतालचे संपूर्ण शेतकरी मदतीला धावून गेले आणि त्या सर्व शेतकरी यांनी गावकऱ्यांना फोन करून सुचविले व गावकण्यानी घटनेच्या दिशेने लगेच धाव घेऊन हि माहिती वनविभागाच्या ढोके याना या सर्व माहिती दिली ढोके मॅडमनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमीला दवाखान्यात हलविण्याचे सांगितले.चिमूर येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येऊन प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी रेफर करून नागपूरला हलविले त्यांच्यावर आता नागपूर येथे उपचार चालू आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular