Monday, June 27, 2022
Homeचंद्रपुरकोरोना १९ अंतर्गत लशीकरणासाठी नागभिड केंद्र सज्यं,२२७४ व्यक्तींनी घेतली कोरोणा लस..

कोरोना १९ अंतर्गत लशीकरणासाठी नागभिड केंद्र सज्यं,२२७४ व्यक्तींनी घेतली कोरोणा लस..

सुधाकर श्रीरामे
नागभीड प्रतिनिधी.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड येथे कोरोना १९ अंतर्गत केंद्र,लसीकरण मोहीम ३ फेब्रुवारी २०२१ पासून राबवीत आहे.
राज्य शासनाने कोरोना संसर्ग वाढू नये यास्तव प्रतिबंधातमक उपाय म्हणून मास्क लावून राहने आणि शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे बंधन कारक आहे.


कोरोना काळात ज्यांनी आपली सेवा जनतेसाठी समर्पित केली होती.यात आरोग्य,पोलीस, महसूल,या विभागातील कर्मचारी, अधिकारी यांना शासनाने आवश्यक सेवा याकरिता कोरोना लस उपलब्ध करून दिली आहे.
कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ होत असल्याने व्यापारी व ज्येष्ठ नागरिकांना कोरोना पासून दूर ठेवण्यासाठी विशेष सत्तीचे प्रयत्न करीत आहे.कोरोना संसर्ग होण्याची शक्यता असतानाही अनेक ठिकाणी जनता दिलेल्या नियमावलीचे पालन करताना दिसत नाही.शासनाने केलेल्या सक्तीमुळे जनता स्वच्छेने कोरोना लस टोचून घेत शासनाला सहकार्य करीत असल्याचे दिसून येत आहे.
नागभिड येथील कोरोना १९ केंद्रावर ३ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२१ पर्यन्त महिला व पुरुष यांची चाचणी करून २२७४ व्यक्तींना कोरोना लस देण्यात आली आहे.नागरिकांनी आपली तपासणी करून घ्यावी असे वैद्यकीय अधिकारी डॉ.कामडी यांनी आमचे प्रतिनिधी सुधाकर श्रीरामे यांचेशी बोलून सांगितले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular