Monday, June 27, 2022
Homeचंद्रपुरकोरपना तालुक्यातील 17 ग्रामपंचायत चा निकाल

कोरपना तालुक्यातील 17 ग्रामपंचायत चा निकाल

तीन ग्रामपंचायत वादाच्या भोवऱ्यात शेतकरी संघटना काँग्रेसचा दावा

कोरपना तालुका प्रतिनिधी


कोरपना तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल घोषित झालात यापूर्वी सत्ता गाजवलेल्या उमेदवारांना मतदारांनी अक्षरशा नाकारल्याचे या निवडणुकीतून दिसून आलेत त्यामुळे तरुण उमेदवारांची चांगलीच चांदी दिसून येते जुन्या राजकारण्याचे मात्र धोबीपछाड झाल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहेत झालेल्या निवडणुकीत नोकारी ग्रामपंचायत मध्ये गोंडवाना गणतंत्र पार्टी ने खाते उघडले कोळशी खु ग्रामपंचायत चा निकाल मात्र चिंताजनक लागला तीस वर्षापासून ची काँग्रेसची सत्ता मात्र या निवडणुकीत शेतकरी संघटनेने बाजी मारली पिंपरी ग्रामपंचायत मध्ये शेतकरी संघटनेत आपले वर्चस्व कायम राखले हिरापूर ग्रामपंचायत मध्ये भाजपला दोन जागेवर समाधान मानावे लागले काँग्रेसने सत्ता काबीज केली पिंपरी, कोडशी, सांगोळा, वनोजा, भारोसा, आवाळपुर, या सहा ग्रामपंचायतीवर शेतकरी संघटनेची एक हाती सत्ता हिरापूर गाडेगाव नांदगाव भोयगाव तळोधी या ग्रामपंचायतीवर काँग्रेसची एक हाती सत्ता कोरपना तालुक्यात लोणी व नाराडा या दोन ग्रामपंचायत वर भाजपाला समाधान मानावे लागले भारोसा ग्रामपंचायत कोरपना पंचायत समितीमध्ये सध्या सभापती म्हणून कार्यरत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या रूपालीताई तोडासे तर माजी सभापती शेतकरी संघटनेचे रवींद्र जी गोखरे या दोन पक्षात मोठी चुरशीची लढत झाली यामध्ये सभापती असलेल्या काँग्रेस पक्षांचा माजी सभापती ने पराभव करून एक हाती सत्ता प्रस्थापित केली वनोजा ग्रामपंचायतीमध्ये भाजपाची सत्ता होती गावकऱ्यांनी भाजप पक्षाला नाकारून शेतकरी संघटनेच्या हातात सत्ता दिल्ली भास्करराव मते यांच्या नेतृत्वात ही निवडणूक पार पडली अशाप्रकारे कोरपना तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल नुकताच पार पडला या निकालाची निवडणूक कोरपना तहसील कार्यालय मध्ये पार पडली सदर निवडणूक ठिकाणी तालुक्यातील सतरा गावातील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली हा परिसर संपूर्ण गर्दीने फुलून गेला कोरपणा येथील ठाणेदार गुरनुले यांनी चोख बंदोबस्त ठेवला तसेच कोरपना येथील तहसीलदार वाकलेकर यांनी अतिशय निवडणुकीच्या ठिकाणी गोंधळ होणार नाहीत व निवडणूक सुरक्षित कशी पार पडेल या उदात्त हेतूने अतिशय उत्तम नियोजन करून निवडणूक शांततेत पार पाडली

तीन ग्रामपंचायत वादाच्या भोवर्‍यात शेतकरी संघटना व काँग्रेस यांचा दावा

आरक्षण सोडतीनंतर या तीन ग्रामपंचायत कुणाच्या सत्ता बसतील याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहेत शेतकरी संघटना व काँग्रेस दोन्ही पक्ष च्या कार्यकर्त्यांनी तीनही गावावर आपला दावा केला आहेत मात्र कोणता पक्ष या गावांवर सत्ता प्रस्थापित करेल याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागलेले आहेत नुकताच निवडणूक पार पडल्यानंतर शेतकरी संघटनेने कोरपणा याठिकाणी पत्रकार परिषद घेऊन शेतकरी संघटना बारा ग्रामपंचायतीवर सत्ता बसेल असा दावा पत्रकार परिषद मध्ये केला आहेत यावेळेस नीलकंठ राव कोरागे,अविनाश जी मुसळे, भास्कर मते, आदी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पत्रकार परिषदेला उपस्थित होते

ग्रामपंचायतीच्या निकालानंतर आता लक्ष आरक्षणाकडे संपूर्ण गावांमध्ये निवडणुकीत कोण बाजी मारेल याचे गणित करत असताना निवडणूक मात्र संपली परंतु आरक्षण काय निघेल या चर्चेत गावगाड्यात चर्चा

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular